कळंब तालुक्यातील दहिफळ ते मलकापूर रस्ता पूर्णपणे खड्ड्यात गेला असून यामुळे वाहनधारक व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे
याविषयीची सविस्तर असे की मलकापूर पाटी ते दहिफळ हा रस्ता खड्डेमय झाला असून या खड्ड्यांमुळे अनेक वाहनांचा अपघात होऊन वाहनधारकांना मोठी इजा झालेली आहे.या रस्त्यावरून दहिफळ, गौर ,वाघोली, ,बारातेवाडी,संजीतपूर सापनाई मोहा अवधुतवाडी व इतर गावांचा बार्शीतील बाजारपेठेशी दररोज संपर्क असतो या गावांना वाहतूककरण्यासाठी जवळचा व सोईचा मार्ग आहे. हा रस्ता गेल्या एक वर्षापासून पूर्णपणे खड्डेमय झाला असून रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ता अशी अवस्था निर्माण झाली आहे. अशा या रस्त्यामुळे अनेक वाहन चालकाचे अपघातामुळे अवयव निकामी झाले आहेत.तसेच यामुळे रोड रॉबरी व भुरट्या चोऱ्या ही वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा रस्ता इतका खड्डेमय झालेला असतानाही लोकप्रतिनिधीचे या रस्त्याकडे कशासाठी दुर्लक्ष आहे असा प्रश्न प्रवाशांतून विचारला जात आहे.
जर रस्त्याचा प्रश्न लवकर सुटला नाही तर आजूबाजूचे ग्रामस्थ जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार घालण्याच्या मार्गावर असल्याचे एकावयास येत आहे.त्यामुळे लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करून प्रवासा योग्य करावा. अशी मागणी वाहन धारक, प्रवासी, ग्रामस्थातून होत आहे.
2 Comments
रस्त्याची दुरावस्था खूप झाली आहे
ReplyDeleteरस्ता महत्वाचा आहे पण प्रशासनाकडून मात्र दुर्लक्ष आहे.
ReplyDelete