दहिफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक समस्यांच्या गर्तेत सापडले असून मागील काही दिवसात येथील कर्मचारी यांच्यात दोन गट झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या भांडणामुळे रुग्णांची गैरसोय व गावाचे नाव खराब होत असल्याचे जनतेतून चर्चिले जात आहे.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत दहा ते बारा गावांचा समावेश आहे.हे प्राथमिक आरोग्य केंद्र मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आले आहे कारण गोळ्या औषधे नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती.येथे कर्मचाऱ्यासाठी निवासस्थान उपलब्ध असतानाही. किती जण त्या निवासस्थानात राहतात हा संशोधनाचा विषय आहे. येथील काही कर्मचारी काही ग्रामस्थांशी सलगी साधून आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत,त्यामुळे मागील काही दिवसापासून कर्मचाऱ्यांचे दोन गट पडले असून कर्मचाऱ्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. यातील काही बिचारे कर्मचारी आपले काम भले आणि आपण म्हणून कामात व्यस्त असतात.
परंतु काही कर्मचारी काम कमी परंतु गावातील काही विशिष्ट नागरिकांच्या संपर्कात असल्याचे दिसून येत आहे.या कर्मचाऱ्याला वैतागून येथील लिपिक व औषध निर्माता बदली करून निघून गेलेले आहेत. त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील एक वर्षापासून औषध निर्माता हे पद रिक्त असल्यामुळे नागरिकांना औषध टंचाई निर्माण होत .
येथील रुग्ण कल्याण समितीच्या मीटिंगमध्ये भरपूर गोंधळ पहावयास मिळाला असून येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संरक्षणासाठी पोलिसांना पाचारण केले होते.त्यामुळे रुग्ण कल्याण समितीच्या मीटिंगमध्ये नेमका गोंधळ कशासाठी व वकाही लोकांचा इंटरेस्ट कशासाठी आहे ग्रामस्थांना समजण्या इतके ग्रामस्थ वेडे नाहीत.
मागील दोन ते तीन वर्षापासून झालेल्या रुग्ण कल्याण समितीच्या निधीचे ऑडिट करण्याची मागणी ग्रामस्थांतूनजिल्हा आरोग्य आरोग्य अधिकाऱ्याकडे करण्यात आली आहे.तसेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करून येथील समस्या जाणून घेण्याचीही मागणी करण्यात आली
त्यामुळे लवकरात लवकर प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त जागा भरून रुग्ण सेवा सुरळीत करावी व कामचुकार कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांतून जोर धरत आहे.
0 Comments