Subscribe Us

येरमाळा येथे महाराष्ट्र दिनानिमित्त साजन विशाल या सुप्रसिद्ध जोडीच्या बहारदार लोकप्रिय गीतांचा भव्य कार्यक्रमाचे आयोजन


तेरणेचा छावा/ येरमाळा:-
      भारतीय जनता पार्टी येरमाळा व शंतनु (भैया) पायाळ मित्र मंडळ सापनाई यांच्या वतीने  यांच्या वतीने १ मे  महाराष्ट्र दिनानिमित्त साजन विशाल या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध जोडीचा बहारदार लोकप्रिय गीतांचा भव्य कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक 1 मे 2022 रोजी सायंकाळी 7 वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येरमाळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.
  शतनू भैय्या पायाळ मित्र मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम सतत राबविले जात असतात.   साजन विशाल ही महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध  गीतकार जोडी असून यांनी महाराष्ट्रासह  भारतातील विविध ठिकाणी तसेच बाहेर देशातही आपल्या आवाजांनी  रसिकांना वेड लावले आहे.अशा गीतकार जोडीचा येरमाळा  परिसरात प्रथमच भव्य कार्यक्रम होत असल्यामुळे नागरिकांना ही सुपर्णसंधी मिळाली आहे.
      तरी या कार्यक्रमाला परिसरातील सर्व नागरिक महिला मंडळांनी उपस्थित राहण्याचा आवाहन शंतनू (भैय्या ) मित्र मंडळ सापनाई  यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments