उस्मानाबाद/ तेरणेचा छावा:-
जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी चंद्रसेन देशमुख (दै. दिव्य मराठी), सचिवपदी भीमाशंकर वाघमारे (दै. पुढारी) यांच्यासह कार्यकारिणीची फेरनिवड बुधवार (.दि 16 मार्च)रोजी करण्यात आली. निमंत्रक अनंत आडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेली बैठकीत हा निर्णय झाला.
या वेळी कमलाकर कुलकर्णी, महेश पोतदार, रवी केसकर, बाळासाहेब मुंदडा, देवीदास पाठक, बालाजी निरफळ, विकास सुर्डी, जी. बी. राजपुत, कालिदास म्हेत्रे आदी उपस्थित होते.
या वेळी खेळीमेळीच्या वातावरणात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. याबरोबरच आगामी काळात विधायक उपक्रम राबविणे, नवनवीन कार्यक्रम घेणे यावर चर्चा करण्यात आली.
कार्यकारिणी अशी : उपाध्यक्ष - बालाजी निरफळ (न्यूज 18 लोकमत), सहचिटणीस - सयाजी शेळके (दै. सकाळ), कोषाध्यक्ष - जी. बी. राजपुत (दै. सुराज्य), प्रवक्ता - अमोल गाडे (दै. संचार), संघटक - विकास सुर्डी (दै. लोकमत), सदस्य - मच्छिंद्र कदम (दै. एकमत), बाबुराव चव्हाण (दै. लोकमत), राजेंद्रकुमार जाधव (दै. प्रजापत्र), राकेश कुलकर्णी (दै. सामना), कालिदास म्हेत्रे (प्रेस फोटोग्राफर), हुंकार बनसोडे (दूरदर्शन), चेेतन धनुरे (दै. लोकमत), तानाजी जाधवर (दै. सकाळ), संजय पाटोळे (आकाशवाणी), अझर शेख (टाईम्स नाऊ), प्रवीण पवार, अमर भातलवंडे, आरिफ शेख (प्रेस फोटोग्राफर). निमंत्रक - कमलाकर कुलकर्णी, अनंत अडसूळ, महेश पोतदार, रवींद्र केसकर, विशाल सोनटक्के, सुहास सरदेशमुख, संजय जहागिरदार, बाळासाहेब मुंदडा.
या वेळी उस्मानाबाद तालुकाध्यक्षपदी देवीदास पाठक (दै. तरुण भारत, आकाशवाणी) यांची निवड करण्यात आली. उर्वरीत कार्यकारिणी तसेच अन्य तालुका कायकारिणींची घोषणा लवकर जाहीर करण्याचा निर्णय बैठकीत झाला.
0 Comments