ॲड. मंजूषा मगर यांचा इशारा
उस्मानाबाद /तेरणेचा छावा:-
निष्ठावंतांची कुंचबना राष्ट्रवादी महिला काँग्रेसमध्ये होत असून अपमानास्पद पध्दतीने पदाधिकाऱ्यांना पदावरून काढले जात आहे. त्यामुळे आम्ही पदांचा सामुहिक राजीनामा देणार असल्याची माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अॅड. मंजूषा मगर व तालुकाध्यक्षा सुरेखा जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
बुधवार दि.१६ मार्च रोजी सुरेखा जाधव यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेस माजी नगरसेविका व उस्मानाबाद शहराध्यक्षा वंदना डोके, कळंब तालुकाध्यक्षा मनीषा साळुंके, प्रीती गायकवाड, अफसाना पठाण, ज्योती माळाळे, ऋतुजा भिसे, स्वाती भातलवंडे, बालाश्री पवार आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
जिल्हाध्यक्षा ॲड. मंजूषा मगर-माडजे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मी उस्मानाबाद जिल्हा नियोजन मंडळाच्या समितीवर सदस्या म्हणून कामे केले आहे. त्याचप्रमाणे तुळजापूरच्या नगराध्यक्षापदी काम केले आहे. जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आम्ही सर्व महिला राष्ट्रवादी काँग्रेससोबत निष्ठेने उभा राहिल्या आहोत.
गेल्या अनेक वर्षांपासून खासदार शरद पवार, सुप्रियाताई यांच्यामुळे निष्ठावंत म्हणून आम्ही कामे केली आहेत, असे असताना राज्यपातळीवरून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या जागी इतर महिलांची नियुक्ती केली जात आहे. किमान विश्वासात घेणे किंवा कल्पना देऊन नवीन नेमणुक केल्यास कांही वाटले नसते, परंतु कोणतीही कल्पना न देता अत्यंत अपनास्पद इतरांची नियुक्ती करणे योग्य नसल्याची खंत ॲड. मंजूषा मगर-माडजे यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे ज्या जिल्हा निरीक्षक आहे. त्या विनाकारण ढवळाढवळ करून राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे खच्चीकरण केले जात आहे. याबाबत जयसिंगराव गायकवाड व सक्षणाताई सलगर यांना कल्पना दिली आहे, असेही सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसमधील २० पदाधिकारी आपल्या पदाचे सामुहिक राजीनामे देणार असल्याची माहिती ॲड.मगर-माडजे व सुरेखा जाधव यांनी सांगितली.
नाराजी दूर केली जाईल - सक्षणा सलगर
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची नाराजी दुर करण्यात येईल, या संदर्भात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेणार आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या सोबत काम केले आहे. त्यामुळे त्याची नाराजी दुर करण्याची भूमिका घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा व जि.प.सदस्या सक्षणा सलगर यांनी बोलताना सांगितले.

0 Comments