कळंब /तेरणेचा छावा:-
उस्मानाबाद जिल्ह्यातील एकल कलाकारांना कोरोना 19 पार्श्वभूमीवर प्रयोगात्मक कलेवर अवलंबून असलेल्या कलाकारांना एकरकमी अर्थसहाय्य देण्याकरता जिल्हास्तरीय निवड समितीचे गठन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने अशासकीय सदस्य म्हणून उस्मानाबाद जिल्हा समितीवर महादेव महाराज अडसुळ ईटकुरकर यांची निवड करण्यात आलेली आहे.
यासंबंधीचे आदेश पत्र समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्याकडून 9 मार्च 2022 ला अडसुळ यांना मिळाले आहे. या समितीचे जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे आहे तर सदस्यपदी राहुल गुप्ता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद, यलगटे हरी कल्याण मुख्य अधिकारी ,नगर परिषद उस्मानाबाद, भंडारे यशवंत जिल्हा माहिती अधिकारी उस्मानाबाद, पी .एन रुखमे जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी उस्मानाबाद, एन.आर. चौगुले ,जिल्हा समाज कल्याण अधिकारी उस्मानाबाद जिल्हा परिषद प्रेमचंद वसंतराव सप काळ, बँड ,बेंजो चालक तांबरी विभाग उस्मानाबाद महादेव शंकर आडसूळ कलावंत ,,आदिनाथ हरिबा लोखंडे ,कलावंत श्रीमती मंगल रावसाहेब माडजे ,कलावंत दादासाहेब शंकर पाटील, कलावंत हरिदास नागनाथ लिमकर ,कलावंत विलास जाधव अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद ,सदस्य सचिव ,याप्रमाणे ही निवड समिती आहे .या निवड समितीवर महादेव महाराज अडसुळ हे सतत सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतात, कुठलाही सामाजिक कामाचे हिरिरीने भाग घेऊन तो कार्यक्रम पार पडतात.अशा समाजप्रिय ,सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या महाराजांची निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे..
0 Comments