उस्मानाबाद/ तेरणेचा छावा:-
डॉ. वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुल गडपटी, उस्मानाबाद येथील द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी कुमारी धनश्री अच्युतराव मुळे हिने सोजर कॉलेज ऑफ फार्मसी खांडवी बार्शी यांच्या तर्फे महिला दिनाचे औचित्य साधून स्त्री पुरुष समानता उद्याच्या भविष्यासाठी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. या विद्यार्थिनीला प्रा. शिवानी डोके यांचे मार्गदर्शन लाभले. सदर स्पर्धेसाठी राज्यभरातून जवळपास 400 विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदवला. या यशाबद्दल महाविद्यालयाचे विश्वस्थ डॉ. प्रतापसिंहजी पाटील, प्राचार्य डॉ.शेख गाझी व महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व इतर कर्मचाऱ्यांनी तिचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
0 Comments