Subscribe Us

जमाले गोट फार्म प्रकल्पास कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची भेट.



सहाव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी शेळीपालन प्रकल्पास दिली शैक्षणिक भेट.
उस्मानाबाद/ तेरणेचा छावा
      कसबे तडवळे ता. उस्मानाबाद, येथील जमाले शेळी पालन प्रकल्पास कृषि महाविद्यालय आळणी गडपाटी येथील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक भेट दिली.
   क .तडवळे येथील शेळी पालन प्रकल्पास कृषि महाविद्यालयातील सहाव्या सत्राच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेटी अंतर्गत या प्रकल्पास भेट दिली. प्रगतशील शेतकरी तथा उद्याजोग प्रा. तुळशीदास जमाले यांनी त्यांच्या प्रकल्पाच्या भेटीदरम्यान आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शेळी पालनाची सर्व उपयुक्त अशी माहिती दिली. ते स्वतः एक प्राध्यापक असूनही त्यांच्या उद्योजकतेकडे असलेला कौल विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी असेल असे मत यावेळी पशुसंवर्धन व दुग्धशास्त्राचे प्राध्यापक श्री दळवे एस. ए . यांनी व्यक्त केले.
    या भेटी दरम्यान विद्यार्थ्यांना शेळीपालन तंत्रज्ञानाबरोबरच हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानचीही उपयुक्त माहिती मिळाली. यांमध्ये वनस्पतीचे माती विरहित उत्पादन व त्याचे फायदे प्रामुख्याने पशुपालन मध्ये या हायड्रोपोनिक्स उत्पादित वनस्पतीचे फायदे यावेळी विद्यार्थ्यांना प्रा. जमाले यांनी सांगितले. भेटी दरम्यान प्रामुख्याने 'आफ्रिकन बोर' या प्रजातीच्या शेळीचे व्यवस्थापन व उत्पादन तसेच हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाची जी विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक करिअरसाठी उपयुक्त ठरेल अशी महत्वाची माहिती मिळाली.
    यावेळी उद्योजक प्रा.तुळशीदास जमाले यांच्यासह कृषी महाविद्यालयातील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्राचे प्रा.श्री दळवे एस. ए., प्रा. गुरव सर, प्रा.साबळे मॅडम, प्रा. वाकळे मॅडम, प्रा. सोन्ने सर व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments