उस्मानाबाद/ तेरणेचा छावा:-
कळंब शहरातील कॉग्रेस पार्टी कार्यालयात कळंब तालुका कॉग्रेस पार्टीच्या वतीने उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नुकन संचालक बळंत तांबारे,प्रा.संजय कांबळे तसेच विधानसभा युवक कॉग्रेस नवनिर्वाचित अध्यक्ष शशिकांत निरफळ,उपाध्यक्ष रोहित कसबे यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष धिरज भैय्या पाटील,मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने,तालुकाध्यक्ष पांडूरंग कुंभार यांच्या हस्ते शाल श्रीफळ हार घालुन सत्कार बुधवार (दि.16 मार्च )रोजी करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हाअध्यक्ष धिरज पाटील यांनी कॉग्रेस पक्षाच्या डिजिटल नोंदणी संदर्भात प्रत्येक कार्यकर्त्यांने निष्ठेने काम करावे व प्रत्येकाने डिजिटल नोंदणीमध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त नोंदणी करावी असे आवाहन केले.राजाभाऊ शेरखाने,विशाल शाळू ,दिलिपसिंह देशमुख,विलास करंजकर,यांनी कॉग्रेस पक्ष वाढीसंदर्भात व डीजिटल नोंदणीत संदर्भात मार्गदर्शन केले.प्रस्ताविकपर भाषणात पांडुरंग कुंभार यांनी महाविकास आघाडी येथुन पुढील निवडणुका एकत्रित लढल्या तर असेसच यश संपादन होईल.तसेच दोन्ही संचालक यांनी व जिल्हाध्यक्ष धिरज भैय्या यांनी पुढाकार घेऊन नगरपरिषदा व जिल्हा परीषद पंचायत समिती मार्केट कमिटी खरेदी विक्री संघ या सर्व निवडणुकीत आपण महाविकास आघाडीची अशीच मुठ बांधावी अशी अपेक्षा व्यक्त केली.याप्रसंगी जिल्हा सचिव भुषण देशमुख,अँड नितिन अंगरखे जिल्हाध्यक्ष सेवादल यंग ब्रिगेड प्रणित डीकले,अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष शहाजान शिकलगार,किसान सेलचे शहराध्यक्ष शिलानंद शिनगारे,महिला जिल्हा उपाध्यक्ष ज्योती पाटील सपाटे,महिला तालुकाध्यक्ष अंजली ढवळे,तालुका उपाध्यक्ष वैशाली धावारे,कलिम तांबोळी,युवक शहराध्यक्ष ताहेर शेख,मागास्वर्गीय शहराध्यक्ष विश्वास हौसलमल,तनपुरे मँडम,बालाजी पवार,ताजोद्दिन सय्यद,सेवादल तालुकाध्यक्ष पोपट अंबीरकर,नासेर शेख,व्ही जे एन्टी तालुकाध्यक्ष राजेंद्र पुरी,ओ बी सी शहराध्यक्ष हरीदास जाधव,हरिष ताटे,रोहन कुंभार यांची उपस्थिती होती.यानंतर आभार शहर कार्याध्यक्ष सचिन गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले.
0 Comments