दहिफळ तेरणेचा छावा:-
उमरा (परतापुर) येथील सामाजिक व राजकीय कार्यकर्ते उमेश किसनराव जाधव यांची शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
सरपंच वंदना जाधव यांच्या अध्यक्षतेखाली जि प शाळेत व्यवस्थापन समिती निवडीसाठी बैठक घेण्यात आली होती यात अध्यक्ष उमेश जाधव उपाध्यक्ष स्वाती जाधव सदस्य संजीता शिंदे , सुप्रिया बाराते , हरिचंद्र कदम ,नारायण जाधव यांची निवड करण्यात आली . यावेळी पालक ,शिक्षक यांची यावेळी उपस्थिती होती
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनवे सर यांनी केले तर आभार शिंदे सर यांनी मानले शिक्षणाविषयी तळमळ असलेले कार्यकर्ते उमेश जाधव यांची निवड झाल्याबद्दल गावकरी, मित्र परिवार यांच्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
0 Comments