उस्मानाबाद/ तेरणेचा छावा:-
8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयुष्य व्यसनमुक्ती केंद्र यांच्यातर्फे आशा वर्कर व महिला स्टाफ यांचा गुणगौरव पुरस्कार व सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजक आयुष व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक श्री डॉ. संदीप तांबारे हे होते.
या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बार्शी नगरपालिकेच्या आशा वर्कर सुपरवायझर सौ.शिवकन्या पौळ, राष्ट्रवादी पक्षाच्या सामाजिक व न्याय विभाग उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष सौ.सुनंदा भोसले, राष्ट्रवादी पक्षाच्या सामाजिक व न्याय विभाग कळंब तालुका अध्यक्षा सौ.स्वाती भातलवंडे, चिखर्डे विभागाच्या आशा वर्कर सुपरवायझर सौ.कमल वाघमोडे, आयुष व्यसनमुक्ती केंद्राच्या नर्सिंग सुपरिटेंडेंट सौ.जयश्री लोमटे, आयुष केंद्राच्या कौटुंबिक समुपदेशक सौ.मृणालिनी मोरे, पत्रकार सौ.सुवर्णा तांबारे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सौ.कविता अंधारे यांनी भूषवले.
समाज निरोगी आरोग्यदायी रहावा म्हणून सतत कायमस्वरूपी प्रयत्न करणाऱ्या व प्रशासनाचा कणा असणाऱ्या आशावरकर यांचा गुणगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. आशा वर्कर या तळागाळातील सर्वसामान्य पर्यंत जाऊन ऊन सेवा व माहिती देण्याचे काम करतात. तसेच या covid-19 च्या काळामध्ये सुद्धा त्यांनी महत्त्वपूर्ण अशी कामगिरी पार पाडली. एकूण 31 आशा वर्कर यांना हा पुरस्कार प्रधान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सव शिवकन्या पौळ मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले ही व्यसन मुक्ती ही चळवळ आम्ही आशा वर्कर दारोदार पोहोचू आणि हा संकल्प या जागतिक महिला दिनानिमित्त त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या पत्रकार सौ.सुवर्णा तांबारे मॅडम यांनी महिलांचे हक्क व अधिकार याविषयी माहिती दिली.
सत्काराला उत्तर देताना आशा वर्कर पैकी अनेकांनी आपली मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी बार्शी तालुक्यातील अनिता मस्के, राजश्री गायकवाड, शितल कानडे, श्रुतिका सगट, रोहिणी पवार, शितल साखरे, तृप्ती ठाकूर,रोहिणी सगट,अश्विनी भुजबळ,दैवशाला खैरे,अनुराधा बागडे,दुर्गा आतकरे,उर्मिला नन्नवरे,बालिका सुरवसे तसेच आयुष व्यसनमुक्ती केंद्रातील महिला देवकन्या मकवान, सिंधू शिनगारे, प्रियंका खुरंगळे ,स्नेहल शिंदे,मयुरी पवार आदींचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अश्विनी डिसले यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ.सिंधू शिनगारे यांनी केले.
0 Comments