दहिफळ/तेरणेचा छावा :-
दहिफळ येथील मागील तीस वर्षांपासून सुरू असलेले नागनाथ मेडिकल अँड जनरल स्टोअर्स स्थलांतर सोहळा सोमवार (दि 7 मार्च )रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पार . दहिफळ येथे 30 वर्षापूर्वी गावात एकमेव मेडिकल अँड जनरल स्टोअरची सुरुवात करण्यात झाली होती . दहिफळ व परिसरात एकमेव मेडिकल असल्यामुळे त्या वेळी परिसरातील पशुपालक शेतकरी ,आजारी पेशंटसाठी मोठा आधार होता .
30 वर्षापासून व्यवसाय करीत जनसेवा केल्यामुळे मोठा जनाधार त्यांना मिळालेला आहे सगळ्यांच्या तोंडात बसाटे यांचे नागनाथ मेडिकल असेच परिसरात प्रसिद्ध आहे.
गावाची लोकसंख्या वाढल्यामुळे गावाचा विस्तार वाढू लागला आहे यातच रुग्णासाठी व व्यवसायासाठी सुसज्ज असलेल्या जिजाऊ चौक (चौरस्ता ) गौर रोड वर स्थलांतर सोहळा केज चे माजी सरपंच तथा काँग्रेसचे बीड जिल्हा उपाध्यक्ष सुरेश तात्या पाटील यांच्या हस्ते पार पडला .यावेळी सरपंच चरणेश्वर पाटील .डॉ .अक्रूर बाराते ,डॉ अंकुश वाघमारे ,डॉ एम.डी. गिरी पशुवैद्यकीय अधिकारी शेळके डॉ.व्यंकटेश दिवाने , मधुकर भुसारी,वसंत मते ,केशव मते ,सतीश मते ,शहाजी ढवळे ,दत्तात्रय वाघमारे ,समाधान मते ,सुधीर मते ,सुनील पाटील,बालाजी गोरे ,अरविंद पाटील फार्म चे मालक सुरेश बसाटे व ग्रामस्थ यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
0 Comments