*प्रेस नोट*
उस्मानाबाद/तेरणेचा छावा:-
समाज कल्याण विभाग जिल्ह्यापरिषद उस्मानाबाद ,जिल्हा सामान्य रुग्णालय व पंचायत समिती उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमानाने दिव्यांग व्यक्ती वैश्विक ओळखपत्र वितरण विशेष मोहीम अभियान उस्मानाबाद येथे सोमवार (. दि.8 मार्च )रोजी पार पडले या अभियानात उस्मानाबाद तालुक्यातील वेगवेगळ्या भागातून दिव्यांग व्यक्ती उपस्थित होते यामध्ये दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळख पत्र वाटप करण्यात आले तसेच वैश्विक ओळख पत्राबाबतीत दिव्यांग व्यक्तींना समुपदेशन करण्यात आले सर्व तांत्रिक बाबी दिव्यांगाना समजून सांगून त्या ओळ्खपत्राबाबतीत सहकार्य करण्यात आले यावेळी समाज कल्याण विभागाचे भारत कांबळे शासकीय रुग्णालयाचे गणेश पाटील प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे समाज कल्याणचे शिंदे प्रहारचे कार्याध्यक्ष महादेव खंडाळकर, तालुकाध्यक्ष बाबासाहेब भोईटे,नवनाथ कचार, राजेश भिसे आदी मान्यवर उपस्थित होते...
0 Comments