उस्मानाबाद/ तेरणेचा छावा:-
वडगाव सिद्धेश्वर येथे एन एम एम एस, ,स्कॉलरशिप , नवोदय शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा सत्कार रविवार दिनांक 13 मार्च रोजी जिल्हा परिषद प्रशाला वडगाव सिद्धेश्वर येथे आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ.भागवतराव मोरे यांची उपस्थिती होती.
यावेळी मुख्याध्यापक शिवाजीराव फाटक,उपसरपंच जयराम मोरे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ पाटील, रामहरी मोरे उपाध्यक्ष अभिमान वाडकर शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य जिल्हा परिषद व माध्यमिक प्रशालेचे सर्व शिक्षक वृंद गावातील शिक्षक विद्यार्थी ग्रामस्थ यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी.आर. पाटील यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती रजनी रावळे यांनी केले
0 Comments