डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुलात सौ.कमल ताई कुंभार यांचा सत्कार संपन्न
उस्मानाबाद/ तेरणेचा छावा:-
महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपतींच्या हस्ते नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित सौ.कमलताई कुंभार यांचा सत्कार आळणी येथील डॉ. वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुल येथे धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
यावेळी एसबीएनएम महाविद्यालयाचे प्राचार्य सुरज ननवरे,आर.पी.कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.गाझी शेख, एस.पी.पॉलिटेक्नीकचे प्राचार्य अमर कवडे,डॉ.गणेश मते,प्रा. सुबोध कांबळे,दत्तात्रय घावटे,राम सुतार,अभिरुद्र सुतार,दत्ता काकुर्णे यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते
पुढे बोलताना डॉ.प्रतापसिंह पाटील म्हणाले की, संपूर्ण भारतात उस्मानाबाद जिल्ह्याची मान अभिमानाने उंचविणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सौ.कमलताई कुंभार, हिंगळजवाडी यांना जागतिक महिला दिनी केंद्र शासनाच्या वतीने दिला जाणारा नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.पशुपालन, कुक्कुट पालन, सौरऊर्जा उपकरणांद्वारे त्यांनी सर्वसामान्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविला आहे. त्यांच्या या ज्ञानाचा माहितीचा उस्मानाबाद जिल्ह्यासाठी भविष्यात नक्कीच उपयोग होईल आणि त्यांना मिळालेला पुरस्कार हा उस्मानाबाद जिल्ह्याची एक चांगली ओळख होण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
यावेळी बोलताना कमलताई कुंभार यांनी देखील सत्काराबद्दल आभार व्यक्त करत त्यांची नेमकी जडणघडण व पुरस्काराबद्दल निवड कशी झाली हे देखील यावेळी विशद केले.
भविष्यात देखील मला समाजासाठी चांगले काम करायचे असून मला डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या सारख्या सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या व्यक्तींची गरज भासेल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.
0 Comments