उस्मानाबाद/ तेरणेचा छावा:-
: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दसमेगाव तालुका वाशी येथील उपक्रमशील व प्रयोगशील शिक्षक प्रशांत भानुदास जाधवर यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांच्यावतीने दिला जाणारा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार 2022 प्रदान करण्यात आला आहे . गेली पंधरा वर्षे शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन शाळास्तरावर राबवलेले विविध नाविन्यपूर्ण उपक्रम , कोरोना कालखंडामध्ये त्यांनी केलेले उल्लेखनिय कार्य , शाळास्तरावर वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन ही व्यापक स्वरूपाची राबवलेली संकल्पना , विविध सामाजिक चळवळीतून त्यांनी समाजासाठी आतापर्यंत केलेले सामाजिक कार्य ,गेल्या दहा वर्षांमध्ये त्यांचे शाळा स्तरावरील विद्यार्थी दत्तक घेण्याचा उपक्रम , विद्यार्थ्यांना केलेली शैक्षणिक मदत , महापुरुषांच्या व महामानवाच्या जयंत्या नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा करण्याचा त्यांचा हातखंडा , व्याख्यानाच्या माध्यमातून व व्याख्यानमालेच्या माध्यमातून त्यांनी केलेले समाज प्रबोधन , शाळा स्तरावर काम करत असताना त्यांनी लोकवाट्याच्या माध्यमातून शाळेचा केलेला कायापालट ,विद्यार्थी शाळेत आला पाहिजे ,आलेला विद्यार्थी टिकला पाहिजे आणि टिकलेला विद्यार्थी शिकला पाहिजे यासाठी त्यांनी शाळेमध्ये राबवलेले विविध नाविन्यपूर्ण गुणवत्तापूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवून गुणवत्तेला उपक्रमाची दिलेली जोड यासह इतर सर्व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे .
सोहळ्याचे अध्यक्ष सुप्रसिद्ध विचारवंत रमेश आव्हाड , प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध विचारवंत श्यामसुंदर सोन्नर आळंदीकर , इंटरनॅशनल टॅलेन्ट आयकॉन विशाखापट्टमनम डॉ . जे . सानिपीना राव व इतर सर्व सन्माननीय मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य - दिव्य अशा शानदार सोहळ्यामध्ये 10 मार्च २०२२ रोजी पुणे येथे सन्मानचिन्ह , गौरवपदक , मानपत्र , महावस्त्र , मानकरी बॅच , मानाचा फेटा परिधान करून त्यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला .
प्रशांत जाधवर यांच्यासारख्या चळवळीतल्या उपक्रमशील शिक्षकाच्या कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल शिक्षक संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, राज्याचे प्रसिद्धी प्रमुख भक्तराज दिवाणे , जिल्हा सरचिटणीस विठ्ठल माने , वाशी तालूका शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संतोषराव मोळवणे , महिला आघाडीच्या उपाध्यक्षा अनुराधा देवळे , संघ शिलेदार सुहास नन्नवरे ,गटशिक्षणाधिकारी रामलिंग जाधव , माजी विस्तार अधिकारी एस. आर .कुलकर्णी ,विस्तार अधिकारी किसनराव जगदाळे , कार्यालयीन विस्तार अधिकारी कुमार माळवदकर , केंद्रप्रमुख एम.पी.कांबळे केंद्रप्रमुख कल्याणराव सुरवसे , आश्राजी कावळे , शहाजी शिंदे , महेंद्र शिंदे , मुख्याध्यापक डी . एल . चौधरी , भारत भालेकर इत्यादीसह सर्व स्तरातील नागरिकातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे .
0 Comments