दहिफळ /तेरणेचा छावा:-
सापनाई येथील भूमिपुत्र पृथ्वीराज विठ्ठल बाराते यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पोलीस उपनिरीक्षक पदी (पीएसआय)निवड झाल्याबद्दल व येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक गोकुळदास प्रल्हाद मैदाड यांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने जि.प.शाळेत त्याचा शुक्रवार (दि.11 मार्च )रोजी शाल , ,फेटा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच भिवराबाई बाराते उपसरपंच ॲड. विष्णू डोके पोलीस पाटील धनंजय ताकमोगे , संतोष पाटील ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव भांगे ,उपाध्यक्ष श्रीहरी पायाळ सदस्य शहाजी कांदे सचिव चंद्रसेन बाराते अशोक पवार ,धनंजय बाराते, प्रशालेचे मुख्याध्यापक व वशिष्ठ उकरंडे शिक्षक सुभाष पेजगुडे,किशोर मुंडे, रमेश गावित, राजेंद्र दीक्षित महेश लवटे ,श्रीमती कदम आदी सह विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश लवटे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुभाष पेजगुडे यांनी मानले.
0 Comments