Subscribe Us

प्रिटींग प्रेस चालकाची मुलगी फौजदार परीक्षेत उत्तीर्ण


 
कळंब/ तेरणेचा छावा:-
कळंब शहरातील प्रिंटिंग प्रेस चालक रामेश्वर खापे यांची मुलगी ऋतुजा खापे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत  पीएसआयची पदाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल शहरातील विविध संघटना, नागरिकांमधून सत्कार करण्यात आले 
 कळंब-शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात  कुमारी ऋतुजा रामेश्वर खापे हिचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य कुपकर जे .डी. हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रणसम्राट क्रीडा मंडळाचे कार्याध्यक्ष तथा प्रियदर्शनी को-ऑपरेटिव बँकेचे चेअरमन श्री श्रीधर (बाबा) भवर, साप्ताहिक साक्षीचे संपादक सुभाष घोडके तसेच ऋतुजा खापे चे पालक रामेश्वर खापे उपस्थित होते. यावेळी ऋतुजा खापे हिने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ऋतुजा खापे हिचे शिक्षण सावित्रीबाई फुले विद्यालयात झालेली आहे. यावेळी विद्यालयातील विज्ञान विषय शिक्षक ज्ञानेश्वर तोडकर यांचा वाढदिवस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. मीनाक्षी शिंदे भवर , उपमुख्याध्यापक जाफर पठाण ,भारत स्काऊट गाईड कॅप्टन प्रतिभा गांगर्डे, समर्थ प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका सुलभा शिंदे उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे प्रस्ताविक सांस्कृतिक विभागाचे परमेश्वर मोरे यांनी केले तर सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख श्री काकासाहेब मुंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर तोडकर यांनी केले यावेळी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 ऋतुजा खापे हीच या यशाबद्दल उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रिंटिंग प्रेस चालकांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments