तेरणेचा छावा/बार्शी:-
सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच व्यक्तिगत पातळीवर काम करणाऱ्या महिलांना यावर्षीचा राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार आयुष व्यसनमुक्ती केंद्रामध्ये प्रदान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष येडाई प्रोडूसर कंपनी लि. च्या संचालिका सौ सुमन तांबारे तसेच सुश्रुत हॉस्पिटल च्या प्रशासकीय अधिकारी सौ. कविता अंधारे लाईफलाईन वेल्फेअर सोसायटी चे प्रेसिडेंट माणिकराव तांबारे व येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. संदीप तांबारे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून राष्ट्रमाता जिजाऊ व शिवाजी महाराज यांच्या फोटोच्या पूजनाने झाली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे सत्कार करून पुरस्कार वितरण झाले यामध्ये सौ प्रियंका सुहास चव्हाण- शिंदे, सौ सिंधू बाळू जगदाळे- शिंगारे, सौ स्नेहल संदीप ठोंग- शिंदे सौ अश्विनी ज्ञानेश्वर डिसले, सौ रेवती बालाजी घाडगे -शिंदे सौ. मयुरी अभिजित पवार सौ प्रियांका अजित खुरंगळे.
सौ कविता संजय अंधारे तसेच सौ सविता तुकाराम लोखंडे सौ. महानंदा तानाजी गडदे सौ. मंगल दत्तात्रय धायगुडे व सौ. प्रिया सागर मारुडा यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
अध्यक्षीय भाषण सौ सुमन माणिकराव तांबारे यांनी केले मासाहेब जिजाऊ या अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत त्यांचे आचरण आज आपण प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात करावं असे विचार त्यांनी मांडले.
त्यानंतर सौ कविता अंधारे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्याविषयी विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले डॉ. संदीप तांबारे यांनी मासाहेब जिजाऊ यांचा विज्ञानवादी दृष्टिकोन सांगत आपले विचार मांडले
अशा सुंदर व भव्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रेवती बालाजी घाडगे-शिंदे यांनी केले व आभार प्रदर्शन अश्विनी डिसले यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुजित ढेकळे अण्णा मोरे चेतन गाडे ज्ञानेश्वर डिसले सुरज पवार प्रशांत शेंडगे दादासाहेब आवटे यांनी परिश्रम घेतले.
0 Comments