दहिफळ/तेरणेचा छावा:-
दहिफळ येथे दिवसेंदिवस शासकीय जागेत अतिक्रमण वाढ होत असून ग्रामपंचायत त्याकडे कानाडोळा करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दहिफळ आठवडी बाजाराचे गाव असून येथे दररोज परिसरातील 10 ते 12 गावांचा संपर्क असतो त्यामुळे येथील बाजारपेठेत वर्दळ असते प्राथमिक आरोग्य केंद्र पशुवैद्यकीय दवाखाना विद्युत वितरण कंपनी सबप्टेशन ऑफिस व इतर शासकीय कामासाठी तसेच देशीदारू केंद्र ,बियरबार, धाबे,, कृषी सेवा दुकाने स्वीट मार्ट कपडा मार्केट, बांधकाम साहित्याची दुकाने होलसेल किराणा दुकाने, बकरा ,चिकन सेंटर हिरो होंडा शोरूम, गॅरेज, इलेक्ट्रिक दुकाने प्रायव्हेट दवाखाने, मेडिकल, सराफ दुकाने तसेच इतर अनेक व्यवसायाची दुकाने असल्यामुळे परिसरातील ग्राहक येथील मार्केटसाठी पसंती देत असतात..
दहिफळ येथे सध्या शासकीय जागा ताब्यात घेण्याची स्पर्धा लागल्याचे चित्र दिसत आहे. कुठे रिकामी जागा दिसली की मार शेड अन् दे भाड्याने अशी विचित्र अवस्था गावाची झाली आहे.
वीस ते पंचवीस वर्षापासून गावात अतिक्रमणात रोजच्या रोज वाढ होताना दिसत असून अतिक्रमण धारकांना कोणतेही भय राहिलेली नाही,
बाजार मैदान तर नावालाच राहिले असून चारही बाजूंनी अतिक्रमण व मधेहीअतिक्रमण धारकांनी आपली दुकाने थाटली आहेत यात अनेकांनी शेड मारून भाड्याने दिले आहेत.
ग्रामपंचायत कार्यालयाने तीन शौचालय सहा महिन्यापूर्वी खरेदी केलेली आहेत परंतु शासकीय जागेत कोणी ठेवू देत नसल्यामुळे गावाच्या वेशीजवळ उलटे ठेवण्याची पाळी ग्रामपंचायत कार्यालयावर आली आहे. त्यामुळे नेमकं चाललय काय, कारभारी नुसते नावालाच आहेत की काय?
मागील 5 वर्षात तर अतिक्रमणात जास्त प्रमाण वाढ झाल्याचे दिसून येत असून ग्रामपंचायत कार्यालय नुसती बघ्याची भूमिका का घेत आहे असा संतप्त सवाल ग्रामस्थांतून विचारला जात आहे. ग्रामपंचायत कार्यालय अतिक्रमणधारकांना अतिक्रमण करू नये म्हणून फक्त नोटिसा बजावून रिकामा होत असून पुढे त्याचे काय होते हा संशोधनाचा विषय आहे. असे मागील दहा बारा वर्षापासून असेच चालत आलेले आहे.
अतिक्रमणधारकांना अतिक्रमण करू नका असे ग्रामपंचायत कार्यालयाचे कर्मचारी नोटीस घेऊन गेल्यानंतर माझच तुला दिसला का आधी इतर अतिक्रमण काढ मग माझ्याकडे ये अशी प्रश्नावली एकावायास मिळत आहे.
मंदिर परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायत कडे मागील सात-आठ महिन्यांपासून खंडोबा वारुवाले मंडळांनी अर्ज केलेला आहे त्याची काही कार्यवाही होताना दिसून येत नाही त्यामुळे नेमकं अतिक्रमणधारकांना पाठीशी घालते कोण असा प्रश्न नागरिकातून चर्चिला जात आहे?
ग्रामपंचायतचे कारभारी फक्त गुत्तेदारीची कामे करण्यासाठीच आहेत की गावातील मालमत्तेचे संरक्षण करण्याची त्यांची जबाबदारी आहे की नाही हे त्यांना सांगणार कोण?
अतिक्रमणाबाबत ठोस कार्यवाही न केल्यास पुढील काळात ग्रामदैवत खंडेश्वरी ची यात्रा व आठवडी बाजार यासाठी जागा शिल्लक राहणार नाही याचा तरी कोणी विचार करते की नाही असा सूर सुज्ञ नागरिकांतून विचारला जात आहे. याविषयी ग्रामविस्तार अधिकारी हनुमंत झांबरे यांना विचारले असता अतिक्रमणाचा विषय ग्रामसभेतील मासिक मिटिंग मध्ये घेतला असल्याचे सांगितले असून याविषयी लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
दहिफळ येथील अतिक्रमण याविषयी लवकरच ग्रामस्थांचे एक शिष्टमंडळ लवकरच जिल्हाधिकार्यांची भेट देण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
0 Comments