Subscribe Us

सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत बर का,जरा जपून!


दहिफळ/तेरणेचा छावा:-
कळंब तालुक्यातील दहिफळ गावास  जोडणाऱ्या लहान मोठ्या सर्वच रस्त्यावर तसेच ग्रामपंचायत सरकारी दवाखाना शाळा  तसेच सार्वजनिक पाणीपुरवठा  गावातील मुख्य प्रवेशद्वार  असलेल्या वेशीवर  आदी ठिकाणी 50 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत यामुळे गावातील चोऱ्या दरोडे  व रस्त्यावर घाण करणार्यांना व इतर गैरप्रकारांना देखील आळा बसणार आहे गावातील सर्व महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविल्यामुळे आता गावकऱ्यांना रात्री घरी सुखाची झोप मात्र नक्की मिळणार आहे. तर सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत जरा जपून बर का! असा उपरोधिक टोला मित्रमंडळी एकमेकांना  विनोदाने बोलत असल्याचे दिसून येत आहे. 
                याविषयी सविस्तर माहिती अशी की कळंब तालुक्यातील दहिफळ येथे  शाळेतील साहित्य व  संगणक चोरी तसेच मागील सहा महिन्यांमध्ये दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत गावातील मुख्य रस्त्यावरील घरावर दरोडे टाकून लाखो रुपयांची केलेली लूट व पोलिसांना  कसलाही  लागत नसलेला सुगावा  यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते व रात्र रात्र नागरिक जागे राहत होते तसेच  जिल्हा परिषद ची  शाळा  व येथील प्राथमिक आरोग्य केंद्र  येथील कर्मचारीही मनमानी करत कधी आला कधी गेला सगळं मनमानी कारभार चालू होता तर कोणाचा ही कोणाला ताळमेळ लागत नव्हता गावकऱ्यांना या कामचुकार सरकारी बाबू वर नियंत्रण ठेवणे देखील अवघड झाले  होते. चोरी दरोडे रोखण्यासाठी गावातील  तरुणांचे दक्षता पथक  कार्यरत असून देखील  चोऱ्या दरोड्यांचा घटना आवरणे मोठे जिकरीचे झाले होते.
सर्व प्रकाराला आळा घालनेसाठी  गावात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसण्याच्या  व गावातील लोकांना सुखाची झोप घेऊ द्यायची यासाठी  गावचे सरपंच चरणेश्वर पाटील यांनी संकल्प करून  निर्णय घेतला  सीसीटीव्ही कॅमेरे बसवून गावचे संरक्षण करावे यासाठी ग्रामसभेमध्ये सर्वानुमते  सीसीटीव्हीकॅमेरे बसविण्याचा   निर्णय घेतला व 50 सीसीटीव्ही  कॅमेरे बसविण्यात आले यामध्ये  गावाच्या प्रवेशद्वार आसलेले सर्व 8 मुख्य रस्ते सर्व  मुख्य चौक गावांमध्ये मुख्य रस्त्यावरी महत्वाच्या ठिकाणी   15  व्या वित्त आयोगातील निधीमधून गावातील सर्व ठिकाणे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयासमोर तसेच देवस्थान असलेले महादेव मंदिर खंडोबा मंदिर ,मठ ,समाज मंदिर, देवस्थानाचा चौक   शाळा  तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रवेशद्वार व  शाळेचे प्रवेशद्वार या ठिकाणी कॅमेरे बसविल्यामुळे उशिरा व मनमानीने ये जा करणारे सरकारी बाबू वर देखील बंधन निर्माण झाले आहेत कोण किती वाजता येतो काय शिकवतो किती वाजता आलं परत गेला कधी हे देखील नियंत्रणात आले आहे या साठी सात लाख रुपये खर्च झाला आहे यासाठी सहा हजार मीटर ओ एफ सी केबल व पावर केबल जोडण्यात आला आहे यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात दोन स्क्रीन बसविण्यात आले आहेत  शाळा  गावापासून दूर असल्यामुळे तेथे वायरलेस कॅमेरा देखील बसविण्यात आले आहेत महत्त्वाच्या ठिकाणी तसेच सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरी योजना व मुख्य रस्त्यावर कॅमेरा असल्यामुळे या उपक्रमाचे ग्रामस्थांतून मोठे कौतुक होत आहे
लाईट गेल्यावर देखील सीसीटीव्ही चालू राहावेत म्हणून पॉवर बँक अप ची सोय केली आहे 
    रस्त्यावर सीसीटीव्ही ची नजर आसल्यामुळे  उघड्यावर  सौच्यास जाणाऱ्यांना मोठा चाप बसला आहे, तसेच छेडछाडीचे व इतर प्रकारही यामुळे थांबणार आहेत व गावाच्या रस्त्यावर होणारी घाण बंद झाल्यामुळे सर्व रस्ते स्वछ आहेत यामुळे हागणदारी मुक्त गाव म्हणूनही या गावची निवड होणार आहे. अशा या समाज उपयोगी उपक्रमाबद्दल सरपंच चरणेश्वर पाटील  यांचे ग्रामस्थांतून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments