Subscribe Us

आर.पी. औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये बी. फार्मसी च्या प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांचा ओरिएंटेशन समारोह संपन्न


तेरणेचा छावा/उस्मानाबाद -
डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुल गडपाटी उस्मानाबाद येथील आर.पी. औषधनिर्माण-शास्त्र महाविद्यालय मध्ये डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बी.फार्मसी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभ व ओरिएंटेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून तेरणा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी उस्मानाबादचे प्राचार्य डॉ.नागेश तोर व एग्रीकल्चरल कॉलेज गडपाटी प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील सर हे प्रमुख अतिथी म्हणून तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख गाझी हे अध्यक्षस्थानी होते.
         Bकार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख गाझी यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील संधी व वर्षभरातील महाविद्यालयातील दैनंदिन व इतर वार्षिक कार्यक्रमात बद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉ. तोर सर व डॉ. पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील अमुलाग्र बदल आत्मसात करून स्वतःला व देशाला औषधनिर्माण  क्षेत्रामध्ये अग्रगण्य आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. 
    तसेच त्यांनी औषध निर्मात्यांचे covid-19 च्या  काळामध्ये केलेल्या कार्याचा गौरवोदगार करून आभार व्यक्त केले.  
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया लोंढे तर आभार डॉ. गणेश मते यांनी केलं. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी,प्रथम वर्ष बी. फार्मसी चे विद्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments