Subscribe Us

येरमाळा येथिल जनहित पतसंस्थेला "बॅंको ब्ल्यू रिबन" पुरस्कार अमेरिकास्थित कंपनी मालकाच्या हस्ते प्रदान.

तेरणेचा छावा/उस्मानाबाद:-
येरमाळा येथिल जनहित पतसंस्थेला "बॅंको ब्ल्यू रिबन" पुरस्कार हा पुरस्कार अमेरीका स्थीत सिनियर सायंटिस्ट व अमेरीकेतील नामांकित कंपणीचे मालक तथा बर्थ इंडीया फंड अमेरीका या संस्थेचे संचालक  तथा येरमाळा गावचे सुपुत्र डॉ. बालाजी आगलावे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.येरमाळा ता. कळंब येथील जनहित पतसंस्थेला मागील आर्थीक वर्षातील उत्कृष्ट व कोरोना माहामारीत चांगली कामगीरी केल्याबदल कोल्हापूर येथील अविज प्रकाशन व पुणे येथील गॅलक्सी ईनीमा यांच्या संयुक्ता विद्य माने दरवर्षी दिला जाणारा राज्यस्तरीय "बॅको ब्ल्यू रिबन" पुरस्कार जाहिर करण्यात आला होता, सदरील पुरस्कार कर्नाटक राज्यातील मैसुर येथे देण्यात येणार होता, मात्र जनहित टिम कोव्हीड संकटामुळे मैसुर येथे गेली नाही, तरी देखील सदरील संस्थेने हा पुरस्कार पोष्टाने जनहित पतसंस्थेला पाठवला होता, तोच पुरस्कार डॉ. बालाजी आगलावे यांच्या वाय.सी.सी. मित्र मंडळाने आयोजीत केलेल्या नागरी सत्कारात वितरीत करण्यात आला संस्थेचे संस्थापक मा.श्री. संतोष तौर मार्गदर्शक वल्लभ माशाळकर तज्ञ संचालक मा श्री बळीराम नवले, रामकिसन कोकाटे .दत्ता रणसिंग. सुनील शिंदे .नितीन कवडे. गणेश मोरे. गोवर्धन उगडे, आबासाहेब रुमने यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने हे यश संपादन केले आहे.
कोरोना सारख्या माहामारीत पतसंस्थेने मोफत मास्क वाटप, गरीब कुटूंबाना कीराना कीटचे वाटप, सिनि टायजर वाटप, कोविड टेस्ट लॅब साठी आर्थीक मदत,र्थमल स्क्रीनींगमशिनद्वारा तपासणी, ऑकसीमिटरद्वारा तपासनी, कोरोणा योध्दाचा सत्कार इ. समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे संस्थेला हा पुरस्कार जाहिर झाला आहे. सदरील पुरस्कार १० ते २० कोटी रुपयाच्या ठेवी असलेल्या गटातुन जाहीर झालेला हा पुरस्कार मिळालेला आहे, याप्रसंगी रामराव पाटील, रमेश आगलावे, डी.आर. बारकुल सर, राजाभाऊ बेदरे, अमोल पाटील, बाळकृष्ण पांगरकर, याशिवाय वाय.सी.सी. गुपचे सर्व सभासद, क्लासमेंट ग्रुप, येरमाळा व पंच्क्रोषीतील नागरीक मोठया प्रमाणात उपस्थीत होते.सदरील संस्थेला पुर्वी दिपस्तभ, कर्नाड रिसर्च बॅकींगचा व सहकार रत्न पुरस्कार प्राप्त झालेले आहेत या यशाचे खरे मानकरी सभासद,ठेविदार, व कर्मचारी आहेत असे व्यवस्थापक श्री. शिवप्रसाद घवारे व सह व्यवस्थापक श्री. समाधान भगत यांनी सांगीतले

Post a Comment

0 Comments