दहिफळ/तेरणेचा छावा:-
कळंब तालुक्यातील दहिफळ येथील जि.प.प्रशालेत( दि.१६ ) पालक मेळाव्याचे आयोजन केले होते.या मेळाव्यात सर्वानुमते अध्यक्ष उपाध्यक्ष, सदस्यांची निवड करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक दत्तात्रय वनवे उपस्थित होते.
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून तुकाराम माणिक मते तर उपाध्यक्ष पदी ज्योती रामहरी मते यांची निवड करण्यात आली तर सदस्य म्हणून समाधान मते,भाग्यश्री भातलवंडे, प्रशांत कदम, दिनेश कांबळे,कमल धोंगडे, सर्जेराव हावळे, वैशाली मते,सुरेखा आडसुळ,आदींची निवड करण्यात आली.यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.नुतन अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य यांचा प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सुत्रसंचलन शिक्षक शंकर सावंत यांनी केले तर आभार शिक्षक अनिल भडके यांनी मानले.
0 Comments