Subscribe Us

गौर येथील केंद्रीय प्राथमिक शाळेला डॉ.मधुकरराव देशमुख यांच्याकडून 50 हजार रुपयाची देणगी .

                
दहिफळ / तेरणेचाा छावा:-   जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गौर शाळेचे माजी विद्यार्थी तथा आज रोजी शिर्डी येथे कार्यरत असणारे डॉ .मधुकरजी देशमुख यांनी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गौर ता . कळंब येथे भेट देऊन  बाला उपक्रमांतर्गत चालू असलेल्या विविध घटकांची पाहणी करून शाळेसाठी 50 हजार रुपये  देणगी म्हणून दिली आहे .माननीय  डॉ. मधुकर यशवंतराव देशमुख यांचे शिर्डी याठिकाणी देशमुख हॉस्पिटल या नावाने नावाजलेले हॉस्पिटल आहे . या ठिकाणी गौरच्या आसपासच्या पंचक्रोशीतील नागरिकांसाठी अतिशय  सवलतीच्या दरात सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा  दिल्या जातात .आपल्याकडील अनेक रुग्णांनी या ठिकाणी जाऊन या सेवेचा लाभ घेतलेला आहे . त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होते आहे . गावी आल्यावर त्यांनी शाळेतील विविध उपक्रमाची पाहणी केली व मुलांशी गप्पा मारल्या .त्यांच्या बालपणीची शाळा व आताची शाळा यामध्ये झालेले बदल आणि मुलांच्या सर्वांगीण विकासावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . तसेच शाळेतील सर्व शिक्षक मुख्याध्यापक व विद्यार्थी यांचे कौतुक केले . शाळेमध्ये चालू असलेल्या विविध उपक्रमासाठी शुभेच्छा देऊन त्यांनी शाळेला आर्थिक  भरीव स्वरूपात मदत केली . यावेळी गावातील .श्यामदादा देशमुख , तात्यासाहेब देशमुख, भाऊसाहेब देशमुख उपस्थित होते .यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आप्पासाहेब ताटे व उपाध्यक्ष अण्णासाहेब आसकुळे यांनी डॉ .मधुकरजी देशमुख यांचा शाळेच्या वतीने सत्कार केला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक जावळे सर यांनी केले . तसेच मुख्याध्यापक श्री . मुंढे सर यांनी शाळेतील विविध गोष्टींची माहिती दिली . शाळेमध्ये चालू असलेले उपक्रम व अपूर्ण असलेल्या बाबी पूर्ण करण्यासाठी चालू असलेली शाळेची धडपड सांगितली यावेळी सर्व ग्रामस्थांच्या मदतीने शाळेची झालेली प्रगती पाहून डॉ साहेबांनी देखील समाधान व्यक्त केले .यावेळी श्री. बांगर सर यांनी मुख्याध्यापक , शिक्षक ,शाळा व्यवस्थापन समिती व समस्त ग्रामस्थ गौर यांच्या वतीने डॉ. साहेबाचे आभार मानले .

Post a Comment

0 Comments