Subscribe Us

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कमिटीकडून आमदार विक्रम काळे यांना निवेदन.


 
उस्मानाबाद/तेरणेचा छावा:-
महाराष्ट्र राज्य 1नोव्हेंबर 2005 पूर्वीची जुनी पेन्शनग्रस्त  शिक्षक कर्मचारी यांनी मराठवाड्याचे शिक्षक आमदार मा.विक्रम काळे  यांना गुरुवार (दि.16 डिसेंबर )रोजी निवेदन देण्यात आले..
   या निवेदनात वरील पात्र शिक्षक कर्मचारी यांना पेन्शन लागू करावी, 2)सम्यक समितीचा अहवाल मंत्रिमंडळासमोर कधी  ठेवणार,.3)1नोव्हेंबर  2005 पूर्वीचे शिक्षक कर्मचारी यांची बंद  जी.पी.एफ.खाती पूर्ववत सुरू करावी,  4)जी.पी एफ.खात्यातून गरजेपोटी रक्कम काढता येते, ती सध्या काढता येत नाही.आदि मागण्यांसाठी निवेदन दिले, यावेळी कळकुंबे सर, मोरे सर, बोराडे सर, भोसले सर , पुजारी सर, मुळे सर, गोरे सर, चव्हाण सर आदि शिक्षक कर्मचारी यांची उपस्थिती होती..

Post a Comment

0 Comments