Subscribe Us

संस्थाचालकाचा असाही मोठेपणा पंचवीस वर्षे सेवापुर्ती बद्दल कर्मचाऱ्याला दिली चार चाकी गाडी दिवाळी भेट.

                  
उस्मानाबाद /तेरणेचा छावा:-
कर्मचारी आणि संस्थापक यांचे नाते हे कशा प्रकारचे असते हे कर्मचाऱ्यांकडून अनेका संस्थाचालकाबद्दल ऐकावयास  मिळते.  मात्र उस्मानाबाद जिल्ह्यातील धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील हे एक असे संस्थापक असे आहेत त्यांनी आपल्या कर्मचाऱ्याला पंचवीस वर्षे सेवा पूर्ण केल्याबद्दल नवीन हुंडाईची सेंट्रो ही गाडी भेट दिली आहे. विशेष म्हणजे हा कर्मचारी संस्थेच्या स्थापनेपासून आहे.
      उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा धनेश्‍वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील हे दातृत्व साठी ओळखले जातात. त्यांनी अनेक लोकांना व गोरगरीब जनतेला अनेक वेळा शिक्षणासाठी व आरोग्यासाठी मदतीचा  हात दिला आहे. जनतेसाठी सदै व 24 तास उपलब्ध असलेले लोकमान्य  नेते अशी त्यांची जिल्ह्यात व परिसरात ओळख आहे. covid-19 च्या काळात  लॉकडाऊन वेळेस त्यांनी अनेकांना भरभरून सहकार्य केलेले असल्याचे जनतेतून ऐकावयास मिळते. 
      डॉ.प्रतापसिंह पाटील म्हणतात की,कर्मचारी हा संस्थेचा कणा आहे व या कण्याला जपलं पाहिजे ते केवळ बोलत नाहीत  तर करून ही दाखवतात.अशोक राठोड हे बीड जिल्ह्यातील आहेत व त्यांनी १९९६ मध्ये धनेश्वरी शिक्षण समूहामध्ये कृषी पदविका पूर्ण झाल्यानंतर कृषी सहाय्यक म्हणून कामास सुरुवात केली.त्यानंतर त्यांनी संस्थेत असतानाच आपले पुढील शिक्षणही पूर्ण केले व संस्था हेच आपले घर मानून तब्बल दहा वर्ष एकदाही घरी न जाता संस्थेची सेवा केली. मागच्या महिन्यातच त्यांना धनेश्वरी शिक्षण समूहात रुजू होऊन पंचवीस वर्ष पूर्ण झाली.ते सुरुवातीला पारा ता.वाशी येथे रुजू झाले त्यानंतर त्यांनी औरंगाबाद येथील गेवराई तांडा येथे जवळपास अकरा वर्ष सेवा दिली व नंतर कुंभारी ता. तुळजापूर व आता डोंजा ता.परंडा येथे लोकनेते बाबुराव अण्णा पाटील कृषी तंत्र निकेतन विद्यालय येथे कृषी सहाय्यक म्हणून ते कार्य करत आहेत.या कामाचा गौरव म्हणून धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या कडून हुंडाई कंपनीची सेंट्रो ही गाडी काल लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर भेट देण्यात आली.

कामात अखंड सातत्य,संस्थेबद्दल निष्ठा व दिलेली जबाबदारी पूर्ण करणे या गुणांची कदर करून धनेश्वरी शिक्षण समूहाच्या वतीने आमचे संस्थेचे कर्मचारी अशोक राठोड यांनी पंचवीस वर्षे सेवापुर्ती केल्याबद्दल लक्ष्मीपूजनाचे मुहुर्त साधून हुंडाईची सेंट्रो ही गाडी भेट देण्यात आली.आमची संस्था मोठी करण्यामध्ये कर्मचाऱ्यांचा खूप मोठा वाटा आहे. कर्मचारी चांगले असतील तर संस्था लवकर विस्तारित होऊ शकते त्याच उत्तम उदाहरण म्हणजे धनेश्वरी शिक्षण समूह होय.

      डॉ.प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील
       अध्यक्ष-धनेश्वरी शिक्षण समूह,


मी १९९६ मध्ये धनेश्वरी शिक्षण समूहात सेवेस सुरुवात केली त्यावेळी माझे भविष्य अंधकारमय होते मात्र पाटील कुटुंबीयांच्या संपर्कात आल्यामुळे माझ्या जीवनाचे सोने झाले मला कधीही वाटले नव्हते की मी चार चाकी मध्ये फिरेल मात्र आमच्या संस्थेचे मार्गदर्शक डॉ.वेदप्रकाश पाटील साहेब, संस्थेचे अध्यक्ष डॉ.भैय्यासाहेब, डॉ.आनंद साहेब आमदार डॉ.राहुलसाहेब यांच्या सहवासात राहिल्यामुळे माझे पुढील शिक्षणही पूर्ण झाले तसेच दहावी पास असताना मला त्यांनी त्यावेळी संधी दिली आणि आज मी माझ्या सेवेची पंचवीस वर्षे या संस्थेत पूर्ण केली आहेत अशी संस्था व संस्थापक मिळायला भाग्य लागते. आज मला डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्याकडून हुंडाई सेंट्रो ही गाडी भेट देण्यात आली.मी आज कृतज्ञ झालो. मी बीड जिल्ह्यातील अत्यंत गरीब घरातील व्यक्ती आहे मात्र आज माझं व माझ्या मुलाबाळांचं चार चाकी मध्ये फिरण्याचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मी संस्थेचे मनःपूर्वक आभार मानतो.

                         अशोक राठोड
                      कर्मचारी धनेश्वरी शिक्षण समूह

Post a Comment

0 Comments