शाळा बाहेरची शाळा उपक्रमात जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गौर विद्यार्थ्यांनीची मंगळवार ( दि. 9 नोव्हेंबर) रोजी सकाळी 10:35 वाजता नागपूर आकाशवाणीवर मुलाखत प्रसारित होणार आहे. शिक्षण विभाग कळंब अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गौर येथील इयत्ता सातवी शिकत असणारी विद्यार्थिनी कु स्मिता लिंबराज ताटे व तिचे वडील श्री लिंबराज अर्जुन ताटे यांची मुलाखत नागपूर आकाशवाणी केंद्रावरून 9 नोव्हेंबर रोजी स. 10:35 मिनिटांनी प्रसारित करण्यात येणार आहे माननीय विभागीय आयुक्त नागपूर विभाग , नागपूर यांच्या प्रेरणेने ,प्रादेशिक विद्या प्राधिकरण रवी नगर , नागपुर व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शाळा बाहेरची शाळा हा उपक्रम राबवला जातो या उपक्रमाच्या 119 व्या भागात जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गौर ची विद्यार्थिनी कु . स्मिता लिंबराज ताटे व तिचे वडील श्री . लिंबराजअर्जुन ताटे यांची मुलाखत आकाशवाणी नागपूर केंद्रावरून 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:35 मिनिटांनी प्रसारित होणार आहे .लॉक डाऊनमध्ये मुलांची बंद असणाऱ्या शाळा तरी त्यांचे शिक्षण सुरू राहावे , यासाठी जिल्हा परिषद केंद्रीय शाळा गौर या शाळेतील शिक्षकांनी ऑनलाइन , ऑफलाइन , अभ्यास गट ' शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप , गुगल मीट , झूम ॲप च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवले . शिक्षकांनी केलेले प्रयत्न व त्या प्रयत्नांना विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद आणि त्या विद्यार्थ्यांचे अनुभव कथन करण्यासाठी नागपूर आकाशवाणी केंद्रावरून सदर मुलाखत प्रसारित होत आहे . कळंब तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी मा .तोडकर साहेब यांनी विस्ताराधिकारी , केंद्रप्रमुख , मुखाध्यापक ,सर्व शिक्षकांचे कौतुक करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
गौर येथील केंद्रीय प्राथमिक शाळा विविध शालेय व शाळा बाह्य उपक्रमांमुळे परिसरात आदर्श शाळा म्हणून नावारूपाला येत असल्याचे दिसून येत आहे.
0 Comments