उस्मानाबाद/तेरणेचा छावा:-.
12 सप्टेंबर २०२१ रोजी NTA घेतलेल्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून निकालामध्ये श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले कॉलेजने सातत्याने केलेल्या प्रयत्नामुळे हे यश मिळाले आहे अभ्यासक्रमाचे योग्य नियोजन नियमितपणे घेतलेल्या परीक्षा रात्र अभ्यासिका दत्तक पालक योजना गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन नेट व जेईई साठी दिल्ली कोठा हैदराबाद येथील PCMB साठी विशेष प्राध्यापक यामुळे कॉलेजमध्ये 512 पेक्षा अधिक गुण मिळविणारे एकूण सहा विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांनी एमबीबीएसला निश्चितपणे प्रवेश मिळेल व 300 पेक्षा अधिक गुण असणारी 20 विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना बीडीएस व बीएएमएस प्रवेश मिळू शकेल श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयात मागील सात वर्षांपासून फोटोन बॅच मध्ये नीट जेईई साठी विशेष तयारी करून घेतली जाते या विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी दिल्ली कोटा व हैदराबाद या ठिकाणाहून PCMB चे प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या अभिप्राय नुसार नियुक्त केले आहेत त्यामुळेच मागील दोन वर्षापासून येथील विद्यार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये यश मिळवत आहेत NTA ने जाहीर केलेल्या निकालानुसार येथील श्री अमर युवराज उंबरे 575 कुमारी अंकिता बालाजी कुंभार 548 शिंदे पंकज बाळासाहेब 538 कुमारी प्रतिभा सुनील यादव 530 कुमारी साक्षी सुनील पवार 517 कुमारी प्रतीक्षा पद्माकर लोमटे 512 हे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत या विद्यार्थ्यांना निश्चितपणे एमबीबीएसला प्रवेश मिळू शकेल हे यश फोटाॅन बॅच मध्ये सकाळी आठ ते सायंकाळी नऊ वाजेपर्यंत सातत्याने केलेले अध्यापन सराव परीक्षा रात्र अभ्यासिका व योग्य मार्गदर्शन यामुळे हे यश मिळू शकले विशेष म्हणजे यापैकी कोणत्याही विद्यार्थ्याने खाजगी शिकवणी क्लास लावलेला नव्हता उल्लेखनीय बाब म्हणजे हे सर्व विद्यार्थी सामान्य कुटुंबातील व सर्वसाधारण होते यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष श्री सुधीर अण्णा पाटील प्रशासकीय अधिकारी श्री आदित्य भैय्या पाटील प्राचार्य श्री देशमुख एस.एस.उपप्राचार्य श्री घार्गे एस के पर्यवेक्षक श्री हाजगुडे टी पी विभाग प्रमुख कला व वाणिज्य नन्नवरे एन आर फोटाॅन बॅच प्रमुख श्री भगत ए व्ही व सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या
0 Comments