उस्मानाबाद/तेरणेचा छावा:-
कळंब तालुक्यातील मोहा येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर ॲग्रो इंडस्ट्रीज या गुळ पावडर कारखान्याच्या व्दितीय गळीत हंगामाच्या प्रथम अकरा पोत्याचे पुजन शनिवार (ता.२३) रोजी मोहेकर मल्टीस्टेट तथा मोहेकर ॲग्रो इंडस्ट्रीज चे संस्थापक अध्यक्ष चेअरमन हनुमंत मडके व शिवसेना नेते प्रशांत (बाबा)चेडे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी मोहेकर मल्टीस्टेट चे कार्यकारी संचालक तथा मोहेकर ॲग्रो इं चे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल मडके,मोहेकर ॲग्रो इंडस्ट्रीज चे कार्यकारी संचालक संतोष मडके,माजी सरपंच बाबासाहेब मडके, धंनजय मडके,अजित मडके तसेच मोहेकर ॲग्रोचे कर्मचारी आदी उपस्थित होते.
उस्मानाबाद जिल्ह्यात चालू वर्षातील गळीत हंगामाची प्रथम सुरुवात केल्यामुळे जिल्ह्यातील व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून मोहेकर ॲग्रो इंडस्ट्रीचे चेअरमन व संचालक मंडळाचे कौतुक होत आहे.
0 Comments