उस्मानाबाद/तेरणेचा छावा:-
भाटशिरपुरा, ता कळंब येथे युवासेना राज्यविस्तारक अविनाश खापे पाटील यांचे आजोबा वैकुंठवशी विठ्ठल अंबादास खापे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त समाजप्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती देशमुख - इंदोरीकर महाराज तसेच खा. ओमप्रकाश भूपालसिंह राजेनिंबाळकर यांच्या हस्ते श्री विठ्ठल (दादा) अंबादास खापे पाटील ग्रंथालय अभ्यासिका उदघाटन समारंभ पार पडला तसेच आ. कैलास पाटील, धनेश्वरी शिक्षण संस्थेचे सचिव प्रतापसिंह पाटील, लातूर जिल्हामध्यर्ती बँकेचे नवनियुक्त संचालक संतोष सोमवंशी, शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी कापसे, राष्ट्रवादी तालुका प्रमुख श्रीधरभवर, काँग्रेस चे तालुका प्रमुख पांडुरंग कुंभार, पं. स. उपसभापती गुणवंत पवार, राष्ट्रवादी वक्ता सेलचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा तुषार वाघमारे इत्यादी सर्वपक्षीय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच मा तहसीलदार उस्मानाबाद जगन्नाथ कदम, सरपंच सौ सुनीता दिलीप वाघमारे, उपसरपंच सूर्यकांत खापे, मा सरपंच अच्युत गायकवाड, सोसायटी चेरमन अंकुश गायकवाड, बालासाहेब खापे, शिवाजी खापे, अरविंद गायकवाड, रामेश्वर शिंदे, विकास गायकवाड, गुलाब भाई शेख, अशोक गायकवाड आणि कार्यक्रमाचे निमंत्रक अतुल गायकवाड, इत्यादी मान्यवर तसेच गावातील नागरिकांच्या उपस्थितीत ग्रंथालय अभ्यासिका उदघाटन समारंभ पार पडला.
0 Comments