Subscribe Us

पोलीस पाटीलच बनला ठाणे अंमलदाराचा वसुली एजंट!


येरमाळा/तेरणेचा छावा:-
       गुरुवारी (दि.14) रोजी पोलीस पाटलाच्या मध्यस्थीने सहायक पोलिस निरीक्षकाने पोलिस ठाण्यात बसूनच निनावी अर्जावर कारवाई न करण्यासाठी लाच मागीतल्याचे निष्पन्न झाल्याने लाच लुचपत विभागाने गुन्हा दाखल केल्याने जिल्हा पोलिस प्रशासनाची लाचखोरी पुन्हा चव्हाट्यावर आली असुन पोलिस पाटला करवी लाचेची मागणी होत असेल तर मग सर्वसामान्य आणि पोलिस प्रशासनातील सलोखा कायम राहावा म्हणून महत्वाचा दुवा मानल्या जाणाऱ्या पोलिस पाटलाच्या नेमणुका लाचखोरीसाठी केल्या जात आहेत का? असा सवाल सर्वसामान्यातून उपस्थित केला जात असुन नव्याने रुजु झालेल्या कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक निवा जैन लाचखोर गणेश मुंढे याच्यावर काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
पोलिस प्रशासन आणि अवैध व्यवसायिकातून चालणारी हफ्तेखोरी आपण समजु शकतो मात्र येरमाळा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक गणेश मुंढे याने निनावी अर्जावर कारवाई न करण्यासाठी मागितलेल्या लाचेचे प्रकाराचा ग्राउंड रिपोर्ट पहिला असता हे प्रकरण जेवढे गंभीर आहे तसे प्रकरणही एक माणूस म्हणुन माणुसकीला काळिमा फासणारे आहे.
    रत्नापुर (ता.कळंब) येथील एका सदन घरातील बावीस वर्षीय तरुणांने १५ जून रोजी आत्महत्या केली.ऐन तारुण्यातील मुलगा गेल्याच्या दुःखातून घर सावरते नाही तो पर्यंत चौथ्या दिवशी सहायक पोलीस निरीक्षक गणेश मुंढे याने गावतील पोलीस पाटील सुशेन जाधवर याच्या करवी आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या भावाला तुझ्या भावाने तुझ्यामुळे आत्महत्या केल्याचा पोलिस ठाण्याला निनावी अर्ज आला आहे.तुझ्यावर कारवाई करु का म्हणत त्रास देण्यास सुरुवात केली. पोलिस पाटला मार्फत सतत कारवाई करण्यासाठी धमकावले व नंतर कारवाई न करण्यासाठी चार लाख रुपयांची मागणी केली,तुमच्या घरात सगळे नोकरदार आहेत चार लाख रुपये देऊ शकत नाही का असा तगादा लावला सततच्या तगाद्याने त्रस्त झालेल्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिलेल्या तक्रार दाराने शेवटी हा प्रकार लाचलुचपत विभागला कळवळा सतत येणारे फोन पैशाची केली जाणारी मागणी यामुळे मानसिक त्रासातून त्यांनी  यासर्वप्रकरचे फोन रेकॉर्डिंग  लाच लुचपत विभागला दिले चार लाखाची मागणी एक लाखावर आल्या नंतर लाच लुचपत विभागाने २१ ऑगस्ट रोजी सापळा रचला असता पोलिस ठाण्यात एक लाख रुपये ऐवजी सत्तर हजार देण्याचे तक्रारदाराने मान्य केल्या नंतर सहायक पोलिस निरीक्षक गणेश मुंढे,रत्नापुरचे पोलीस पाटील सुशेन यांच्या करवी सत्तर हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे पंचासमक्ष निष्पन्न झाले.गुरुवारी (दि.14) रोजी ही रक्कम देऊन रंगेहात पकडण्याचा लाच लुचपत विभागाचा  सुगावा लागल्याने सहायक पोलिस निरीक्षक गणेश मुंढे फरार झाला असला तरी रंगेहात पकडण्याचा प्रयत्न फसला असला तरी २१ ऑगस्ट च्या सापळया नुसार लाचेची मागणी केल्याचे लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात निष्पन्न झाल्याने मध्यस्थ पोलीस पाटील सुशेन जाधवर याला अटक करुन गुन्हा दाखल  करण्याची प्रक्रिया करण्यात आली.
एखाद्या आत्महत्या ग्रस्त कुटूंबाला खोट्या धमक्या देऊन लाचेसाठी त्रास देने हे वास्तव पाहता लाचखोरीसाठी पोलीस प्रशासन किती खालच्या स्तराला जाऊ शकते यावर विश्वास बसत नसला तरी पोलिस प्रशासनाच्या माणसातील संवेदनशीलता लोप पावत चालली असल्याचे दिसते.
येरमाळा पोलिस ठाणे म्हणजे चौरस्त्यावरील ठाणे असुन ठाण्याच्या हद्दीत, मटका,तेरखेडा,वडजी, रत्नापुर,चोराखळी लोक कलाकेंद्रात झुगाराचे आड्डे राजरोस पणे चालत आहेत, वेश्याव्यवसाय ,देशी,विदेशी बनावट दारु बनवण्याचे चार,पाच आड्डे,शिवाय ठाणे हद्दीत हॉटेलिंग व्यवसाय मोठया प्रमाणात असुन उशिरापर्यंत चालणाऱ्या हॉटेल धारकांना हफ्ते मागणे,तेरखेडा येथील फटकाउद्योग कारखानदारांना नियमांचे धाक दाखवुन हफ्ते घेणे,यासाठी येरमाळा पोलीस ठाणे म्हणजे हफ्तेखोरीचे ठाणे म्हणुन पोलीस प्रशासनात प्रसिद्ध असल्याचे जिल्हावाशीयातून चर्चिले जात आहे.
    
     जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनात राज्याच्या सरहद्दीवरील उमरगा पोलीस ठाण्या नंतर येरमाळा पोलिस ठाण्यात पोस्टिंग मिळावी म्हणुन प्रशासनात अधिकाऱ्यांच्या नेमणुकीसाठी घोडेबाजारी चालते असे हफ्तेखोरीचे ठाणे असल्याने येरमाळा ठाण्यासाठी मोठी रक्कम देऊन येथे येण्यास पोलिस अधिकारी आतुर असतात.येता दिवाळी सिजन पाहता या ठाण्यात येण्यासाठी पुन्हा अधिकाऱ्यांचा घोडे बाजार रंगणार हे निश्चित.
चौकट... सहायक पोलिस निरीक्षक गणेश मुंढे याच्या विरुद्ध अनेक तक्रारी असुन हॉटेल धारकांना नवरात्र बंदोबस्तासाठी केलेली पैशाची मागणी,पोलिस ठाण्यात सतत गैरहजर असणे,निनावी अर्जावर कारवाई  न करण्यासाठी मागितलेली लाच पाहता  नव्याने रुजू झालेल्या जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक निवा जैन या एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणुन परिचित आहेत,घडला प्रकार हा माणुसकीला काळिमा फासणारा असुन लाचखोर गणेश मुंढे याची सखोल चौकशी होणार का त्याला सेवेतून बडतर्फ करतात का याकडे येरमाळ्यासह पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

       याबाबत कळंबचे उपविभागीय पोलीस अधिकारी के.रमेश यांना संपर्क साधून एखाद्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला लाचेसाठी धारेवर धरने कितपत योग्य आहे,त्याच्यावर काय कारवाई होणार असे विचारले असता गुन्हा दाखल होताच गणेश मुंढे याला निलंबित करण्यात आले.प्रकरणाची सखोल चौकशी होणार आहे,प्रभारी म्हणून सपोनि संदीप मोदे यांची नेमणुक करण्यात आल्याचे त्यांनी  बोलताना सांगितले.

Post a Comment

0 Comments