कळंब/तेरणेचा छावा:-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विकासात्मक भूमिका ही शासनाच्या माध्यमातून कशा स्वरूपात आहे हे पदाधिकारी यांनी ग्रामीण भागातील लोकांपर्यंत समजावून सांगितली पाहिजे असे प्रतिपादन जिल्हा अध्यक्ष प्रा.सुरेश बिराजदार यांनी कळंब शहरातील जनसंपर्क कार्यालयात पदाधिकारी यांची आढावा बैठकीत दि.४ ऑगस्ट रोजी केले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश बिराजदार पुढे बोलताना म्हणाले की ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधणी करण्यासाठी बूथ कमिटी करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रत्येक बूथ कमिट्या संदर्भात पुढील काही दिवसांत गटवाईज बैठका घेण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्येकांनी आपापल्या गावातील बूथ कमिटी लवकरात लवकर करून घ्यावी.देशाचे नेते खा.शरद पवार साहेबांचे कार्य आजही सर्वांच्या मनात आहे. तसेच सर्वसामान्य जनतेचे पवार साहेबांवर प्रेम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. शरद पवार साहेबांनी प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचे काम केले आहे. त्यामुळे पवार साहेबांचे हे कार्य बूथ कमिटीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष बिराजदार यांनी यावेळी केले. तसेच आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. उस्मानाबाद जिल्ह्यावर पवार साहेबांचे प्रेम आहे. त्यामुळेच उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले. तसेच २१ टीएमसी पाण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेबांनी पुढाकार घेऊन जिल्हावासीयांना पाणी मिळण्यासाठी पुढाकार घेतला आहे. हे कामही प्रगतीपथावर आहे. पवार साहेबांनी जिल्हावासीयांना आत्तापर्यंत भरपूर दिले आहे. त्यामुळे आपण सर्वांनी पवार साहेबांचे कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.
यावेळी भाई गणपतराव देशमुख यांना पक्षाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
व्यसनमुक्ती सेलचे नवनियुक्त प्रदेश अध्यक्ष डॉ.संदीप तांबारे,एस पी शुगरचे सुरेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
या बैठकीत ओबीसी सेलच्या तालुका उपाध्यक्ष पदी वसंत धोंगडे व किसान सभेचे उपाध्यक्ष पदी विश्वनाथ धुमाळ यांची निवड करण्यात आली.
या बैठकीत व्यसनमुक्ती सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संदीप तांबारे प्रदेश सरचिटणीस नितीन बागल,तालुकाध्यक्ष प्रा.श्रीधर भवर,अँड.प्रविण यादव,उपनगराध्यक्ष संजय मुंदडा,कार्याध्यक्ष रमेश देशमुख,युवक कार्याध्यक्ष उमेश मडके,औदुंबर धोंगडे,प्रसिद्धी प्रमुख अविनाश घोडके, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भीमा हगारे,अमर मडके यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी जिल्हा चिटणीस निलेश बावणे ,अँड.प्रविण यादव, उप नगराध्यक्ष संजय मुंदडा,सागर मुंडे,कार्याध्यक्ष रमेश देशमुख,कार्याध्यक्ष सुरेश टेकाळे,वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.तुषार वाघमारे,
शहर उपाध्यक्ष उत्तरेश्वर चोंदे,
सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष किरण मस्के,किसान सभेचे तालुका अध्यक्ष प्रकाश बावणे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष उमेश मडके,कार्याध्यक्ष औदुंबर धोंगडे,राष्ट्रवादी विद्यार्थीचे तालुकाध्यक्ष भीमा हगारे,उपजिल्हाध्यक्षा शोभा मस्के,अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष सलमा सौदागर,शहराध्यक्ष संध्या तोडकर,सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुनंदा भोसले, जिल्हासचिव दर्शना बचुटे,तालुकाध्यक्ष सोनाली माने,सईद काझी,नगर परिषद गटनेते लक्ष्मण कापसे,नगरसेवक अमर गायकवाड, स्वप्निल चिलवंत,संदीप मोरे,अशोक जगताप आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती .
या बैठकीचे सूत्रसंचालन व आभार वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. तुषार वाघमारे यांनी केले.
0 Comments