Subscribe Us

चेअरमन अभिजीत पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा.


उस्मानाबाद/तेरणेचा छावा:-
डी.व्हि.पी उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा धाराशिव साखर कारखाना लि.युनिट क्रमांक 1,2,3 चे चेअरमन श्री अभिजीत धनंजय पाटील यांचा ३८वा वाढदिवसा रविवार (दि.1ऑगस्ट) रोजी विविध समाजोपयोगी कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.
 वाढदिवसानिमित्त सांगली, कोल्हापूर , कोकण विभाग व इतर भागातील पूरग्रस्तांसाठी कारखाना कर्मचारी व कारखान्याच्या वतीने रक्कम रू.1 लाख 11 हजार निधी संकलित करण्यात आला. दहावी मध्ये उत्तीर्ण कर्मचाऱ्यांच्या वाल्यांचा गुणगौरव करण्यात आला तसेच धाराशिव साखर शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले स्वाधार केंद्र विशेष मुलींचे संगोपन केंद्र  येथे अल्पोपहार व फळांचे वाटप केले,  कारखाना परिसरात वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाचा संकल्प करण्यात आला तसेच यावेळी धाराशिव साखर कारखाना  चोराखळी येथे भव्य रक्तदान शिबिरात  77 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
     या  कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार कैलास पाटील यांनी केले तर अध्यक्ष म्हणून  सुरेश तात्या पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी संचालक  रणजीत भोसले, दीपक आदमिले , विकास काळे ,आबासाहेब खारे , संदीप खारे , सुहास शिंदे,डि.व्ही.पी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन  सुरज पाटील ,जिल्हा परिषद सदस्य श्री मदन बारकुल ,चोराखळी ग्रामपंचायत सरपंच खंडेराय मैदाड, दहिफळ ग्रामपंचायत सरपंच चरणेश्वर, रविराज देशमुख ,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
  सदरील कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी कारखान्यातील अधिकारी, कर्मचारीयांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments