तेरणेचा छावा/ दहिफळ :-कळंब तालुक्यातील दहिफळ परिसरात गेल्या आठवडाभरापासून चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत असून यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
गौर येथे गुरुवार (दि.4 ऑगस्ट) रोजी मध्यरात्री दोन ते अडीच च्या सुमारास रोहित थोरवे यांच्या घरातील 3 तोळे सोने व रोख 53 हजार रुपये रक्कमेची चोरी व दोन-तीन घरी चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला .तसेच दहिफळ येथे शनिवार (दि.7ऑगस्ट) रोजी मध्य रात्री वेळी दोन घरावर चोरट्यांनी डल्ला मारला.येथील रहीवाशी नारायण मते यांच्या घरातील व गंगाधर ढवळे यांच्या घरात घुसून सशस्त्र धारी चोरट्यांनी धुमाकूळ घातला.सदरील प्राथमिक माहितीनुसार नारायण मते यांच्या घरातील कपाट उघडून त्यातील रक्कम व12 सोने लंपास केले तर गंगाधर ढवळे यांच्या घरात चोरट्यांनी 185 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व 75 हजार रुपये रकमेची चोरी साधारण रात्री 2 ते 2:30 च्या सुमारास या घटना घडल्या आहेत.
बुधवार (दि. 11 ऑगस्ट) रोजी बाभळगाव येथे भर दुपारी 12 ते 4 च्या दरम्यान श्रीकांत वाघमारे यांच्या घरातील 2 तोळ्याचे 4 जोड सोन्याच्या अंगठ्या, 8 तोळे च्या पाटल्या, सोन्याची बोरमाळ व रोख रक्कम एक लाख 85 हजार असे एकूण 3 लाख 69 हजारची चोरी करून चोरट्यांनी ऐवज लंपास केला आहे
तर गुरुवार (दि.12 ऑगस्ट )रोजी पहाटेच्या सुमारास दहिफळ येथे चिंताबर कोठावळे व श्याम रामेश्वर भातलवंडे यांच्या घरातील 4, 5 हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
दिवसेंदिवस दहिफळ परिसरात चोरट्यांची दहशत वाढत असुन परिसरातील नागरिकातून घबराटीचे वातावरण तयार झाले आहे .पोलिस प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष असल्याचे नागरिक आता उघडपणे बोलू लागले आहेत.परिसरात अवैध धंदे मात्र जोमात सुरू असून यावर पोलीस प्रशासन व इतर यंत्रणाचे कुठलेही नियंत्रण नाही की? जाणून बुजून दुर्लक्ष केले जाते! असा प्रश्न नागरिकांना पडत आहे याविषयी नागरिकांच्या तिखट प्रतिक्रिया उमटत असून प्रशासनाविषयी नागरिकांतून तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे! तक्रारीचा पाढा घेऊन लवकरच परिसरातील दक्ष नागरिक जिल्हा प्रशासनाकडे जाण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
0 Comments