Subscribe Us

गावाच्या रक्षणार्थ सरसावले शेकडो तरुण....ग्रामसुरक्षा रक्षक दलातील जवानावर गावची सुरक्षा.


दहिफळ /तेरणेचा छावा:-
कळंब तालुक्यातील दहिफळ येथे एका पाठोपाठ चोरी झाली.येरमाळा पोलीस स्टेशनला पोलीस फौजफाटा कमी असुन गावे जास्त कर्मचारी कमी आहेत.यात 
गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे.चोरीचे प्रमाण वाढत आहे.
चोरावर नियंत्रण ठेवण्यासाठी दहिफळ गावातील शेकडो तरुण एकत्र येऊन ग्रामसुरक्षा रक्षक दल स्थापन करुन दि.१२ ऑगस्ट रोजी रात्री खडा पहारा देत गस्त सुरू करण्यात आली.गावातील मुख्य रस्त्यावर कडक पहारा ठेवला असुन गावात शिरकाव सहजासहजी मिळणार नाही.तसेच गावातील प्रत्येक रस्त्यावर निवडक युवक हातात काठी घेऊन खडा पहारा देत आहेत.या युवकांच्या जीवावर गावातील नागरिक शांत सुरक्षीत झोप घेणार आहेत.गावात जाणा-या मुख्य रस्त्यावर रात्री पहारा देत असलेल्या युवकांना येरमाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरिक्षक गणेश मुंडे यांनी भेट दिली.जीवावर उदार होऊन गावांसाठी जागणा-या तरुण युवकांचे अभिनंदन केले.तसेच काही अडचण आली तर मला फोन करा.तुमच्या सहकार्यासाठी दररोज रात्री एक कर्मचारी उपस्थित राहील असे सांगितले.व एक पोलिस कर्मचारी उपस्थित राहीले होते.
    गावची सुरक्षा आता ग्रामसुरक्षा रक्षक दलावर असुन नागरिकांनी त्यांना सहकार्य करा.लवकरच झालेल्या घटनेचा तपास करून गुन्हेगारांना पकडण्यात येईल असे सहाय्यक निरीक्षक गणेश मुंडे म्हणाले..
यावेळी सरपंच चरणेश्वर पाटील, पोलीस पाटील मनेश गोरे, शिवाजी मते, प्रदिप भातलवंडे ग्रामपंचायत सदस्य,आश्रुबा भातलवंडे ,प्रशांत मते,लाला लाटे, सज्जन कोठावळे, पांडुरंग भातलवंडे, संजय गोरे,गोरख चव्हाण, तुकाराम भातलवंडे, गणेश मते, विशाल भातलवंडे, विशाल थोरात, निखील अंगरखे, कृष्णा पांचाळ,आदी युवक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments