दहिफळ /तेरणेचा छावा:
कळंब तालुक्यातील दहिफळ येथे पवनराजे लोकसमृध्दी मल्टिस्टेटच्या वतीने डॉ जयप्रकाश राजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा कार्यकर्ती यांचा सत्कार करण्यात आला आंब्याच्या झाडाचे रोप व बेबी किटचे वाटप झाले.
कोरोना काळात कार्य करणाऱ्या आशा कार्यकर्ती यांचा कोरोना योध्दा म्हणून सत्कार करण्यात आला.आरोग्य केंद्रांतर्गत काम करणाऱ्या बाभळगाव,दहिफळ,सापनाई, गौर,बारातेवाडी येथील आशा कार्यकर्ती यांचा सत्कार मल्टीस्टेट चे व्यवस्थापक गणेश शितोळे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी सरपंच चरणेश्वर पाटील, उपसरपंच अभिनंदन मते, वैद्यकीय अधिकारी डॉ मिनाक्षी लामतुरे, डॉ बनसोडे , ग्रामपंचायत सदस्य प्रदीप भातलवंडे, समाधान मते, महादेव कांबळे, सुदर्शन जोशी, शंकर भातलवंडे, अनिकेत गायकवाड, दिनेश मते, ,सुशेन पाटील,रावजी घोणसे कर्मचारी स्टाफ उपस्थित होते.
0 Comments