दहिफळ/तेरणेचा छावा:-
कळंब तालुक्यातील दहिफळ येथील ग्रामपंचायत कार्यालय ने आणलेली शौचालय वापराअभावी ग्रामपंचायत कार्यालयासमोर शोभेची वस्तू बनलेली आहेत.
दहिफळ गावची लोकसंख्या सात ते आठ हजाराच्या आसपास असून दहा ते बारा गावाचा दररोज येथे कार्यालयीन व बाजारपेठेसाठी आसपासच्या खेड्यांची येथे सदा वर्दळ असते. दहिफळचा गुरुवार हा आठवडी बाजारचा दिवस आहे. असे असतानाही येथे आठवडी बाजार मैदानात व इतरत्र एकही सार्वजनिक शौचालय नाही त्यामुळे बाहेर गावातील नागरिकांना व महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शौचालयासाठी मागील दहा वर्षापासून नागरिकांनी ग्रामपंचायत कडे वेळो वेळी विचारणा करत होते.परंतु या गोष्टीकडे कुणीही गांभीर्याने लक्ष दिले नाही. या गोष्टीची निकडीची गरज लक्षात घेता सध्याच्या ग्रामपंचायत कार्यालयाने 3 महिन्यापूर्वी 3 रेडिमेड प्लास्टिक शौचालयाची खरेदी केली. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत होते परंतु नागरिकांचा भ्रमनिरास झाल्याचे दिसून येत आहे. कारण 3 महिन्यापूर्वी आणलेले रेडीमेड शौचालय ग्रामपंचायत कार्यालयासमोर वापरा आभावी शोभेच्या वस्तू प्रमाणे ठेवलेले दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाला शौचालयासाठी मुहूर्त कधी मिळणार असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.
याविषयी ग्रामपंचायत सरपंच चरणेश्वर पाटील यांच्याकडे विचारणा केली असता शौचालय ठेवण्यासाठी जागेसाठी काही नागरिक विरोध करीत असल्यामुळे शौचालयाच्या जागेसाठी ग्रामसभेतून निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
0 Comments