Subscribe Us

गौर येथे उमेदच्या महिलांनी बसस्टैंड वर बसवले सिमेंट बाकडे.


दहिफळ/तेरणेचा छावा:-
गौर येथील उमेदच्या महिलांनी स्वखर्चाने बस स्टॉप वर सिमेंटचे बाकडे बसून आदर्श निर्माण केला आहे.
  बसस्थानक चौकात असल्यामुळे ज्येष्ठमंडळी व महिलांना उभा राहुन बसची वाट बघावी लागत होती. त्यामुळे मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे उमेदच्या महिलांनी एकत्रित येत स्वखर्चाने सिमेंट बाकडे खरेदी करून बसस्थानक चौकात सरपंच मेघनाताई देशमुख व जि प शाळेचे निकाळजे सर यांच्या हस्ते सोमवार (दि. 16 ऑगस्ट )रोजी पूजन करून लोकार्पण केले.
    यासाठी ग्रामसंघ अध्यक्ष कुसुमताई देशमुख यांनी पुढाकार घेतला तर उमेदच्या CRP सुप्रिया सोनवने त्यांनी  प्रोत्साहन दिले.तसेच  रेणुका खुने,वर्षा कांबळे,बेबीनंदा मस्के, लैला ताकपिरे,अनुजा साळवे, दिपाली कोळी,प्रांजल कोळी,सलमा तांबोळी,रुकसाना तांबोळी या उमेदच्या महिलांनी सहकार्य केले. या उपक्रमाबद्दल उमेदच्या महिलांचे ग्रामस्थांतून अभिनंदन होत आहे.
 

Post a Comment

0 Comments