उस्मानाबाद/तेरणेचा छावा:- दि. 16 ऑगष्ट 2021 रोजी उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृहामध्ये शेतकरी संघटनेच्या मराठवाडा विभागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली .
या बैठकीला राज्याचे प्रदेश अध्यक्ष मा. श्री .आनिल घनवट साहेब , महीला आगाडीच्या प्रदेश अध्यक्षा मा . सीमाताई नरोडे , राज्याचे उप अध्यक्ष मा. शंकरराव गायकवाड आदी मान्यवर उपस्थीत होते . या बैठकी मध्ये उस्मानाबाद जील्हयातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर सखोल चर्चा करण्यात आली या मध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या कृषीपंपाना मीळनारी आपुरी व कमी दाबाची वीज , सन 2020 चा खरीप हंगामाचा पीकविमा वंचित शेतक -यांना कशा पध्दतीने मीळवून देता येईल , सरकारने केलेल्या पीक कर्ज माफीचा फायदा अध्याप पर्यंत कांही शेतकऱ्यांना मीळालेला नाही या संदर्भात संघटनेची पुढील दिशा , गेल्या वर्षी उस गाळपास दिलेल्या बऱ्याच शेंतकऱ्यां आनकीन साखर कारखान्यानी एफ .आर .पीची रक्कम दिलेली नाही आशा साखर कारखाण्यावर कार्यवाही कारणे , तसेच केंद्र सरकारने नवीन ३ कृषी कायदे काढले हे कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे कि तोट्याचे यावर बैठकीत सवीस्तर व सखोल चर्चा करण्यात आली व वरील सर्व विषयावर पुढील संघटनेच्या आंदोलनाची दीशा बैठकीत ठरवण्यात आली . तदनंतर मा. रामजीवन बोंदर यांची मराठवाडा अध्यक्ष पदी निवड नियुक्ती पत्र देऊन मा. आनील घनवट साहेब प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्रा राज्य यानी केली व पुढील वाटचीलीस त्यांना शुभेच्छा दिल्या .
या बैठकीला प्रा .मारूती कारकर, अॅड नेताजी गरड , रुपेश शंके युवक जील्हाअध्यक्ष लातूर ,विठ्ठल गवळी नांदेड ,परमेश्वर आप्पा पुसुरे बीड , विठ्ठल शेळके नगर , चंद्रकांत भराटे, संतोष राठोड, संजय वाघ , भरत पाटील , सुशील कुमार पाडोळे , सिध्येश्वर सुरवसे महेश गव्हाने , दत्ता पाटील , जयाबाई राठोड , नरवडे आप्पा , शिवाजीराव काळे , बाळासाहेब बोंदर .आदी मान्यवर उपस्थीत होते .
0 Comments