उस्मानाबाद/तेरणेचा छावा:
निधी बँक चेअरमन डायरेक्टर यांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन सोमवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी ॲपल हॉटेल सभागृह येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार व दीप प्रज्वलनाने झाली कार्यक्रमासाठी उस्मानाबाद सोलापूर लातूर बीड जिल्ह्या सह महाराष्ट्रातील निधी बँक चेअरमन संचालक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती
शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शन सहकार मंच संस्थापक मधुकर बोडके यांनी आदर्श व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. सी एस राघव कुलकर्णी यांनी निधी नियम मर्यादा याविषयी मार्गदर्शन केले. तसेच उद्योजक होताना या विषयावर निधी फेडरेशनचे महाराष्ट्र अध्यक्ष संदीप थोरात यांनी मार्गदर्शन केले
या कार्यक्रमात निधी बँकेविषयी अडीअडचणी व पुढील वाटचाली विषयी विचारमंथन झाले कार्यक्रमाचे आयोजन स्नेहलोक मल्टीपर्पज निधी लिमिटेड अक्कलकोट चे डायरेक्टर धर्मराज भोसगी, एम एस बी अर्बन निधी लिमिटेडचे डायरेक्ट बालाजी बारकुल ,जय मल्हार अर्बन निधी लिमिटेड उस्मानाबाद चे डायरेक्टर सूर्यकांत ढवळे यांनी केले होते. कार्यक्रमाची प्रस्तावना बालाजी बारकुल यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा लोंढे यांनी व आभार प्रदर्शन धर्मराज भोसगी यांनी मानले.
0 Comments