Subscribe Us

कलाकारांनी संधी शोधावी-अभिनेते सोमनाथ तडवळकरअभिनय कसा करावा.कार्यशाळा संपन्न.


दहिफळ/तेरणेचा छावा
कळंब तालुक्यातील दहिफळ येथे एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती.या कार्यशाळेची सुरुवात रंग देवता नटराजच्या प्रतिमेची पूजा अभिनेते सोमनाथ तडवळकर,सरपंच चरणेश्वर पाटील यांच्या हस्ते झाले.
तेरणा काठची पोरं मराठी वेबसीरीज च्या वतीने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध सिनेअभिनेते सोमनाथ तडवळकर उपस्थित होते.यावेळी अभिनय क्षेत्रात करिअर करायचं असेल तर आधी अभिनय कसा करावा याविषयी माहिती घ्यावी.तसेच शक्य असल्यास अभिनयासाठी कोर्स आहे तो केला तरी चांगलेच आहे.
आज डिजीटल युग आहे.हातात मोबाईल आहे.त्याच्या माध्यमातून आपल्यातील कलागुण सादर करावा.यातून आपल्याकडे असणारी कला समोर येईल.वेबसिरीज, टिव्ही मालिका यात खुप संधी आहे.ती मिळविण्यासाठी प्रयत्न करा.शोधले तर सापडेल.आधी संधी शोधा असे अहवान सोमनाथ तडवळकर यांनी केले.
   कार्यशाळेत अभिनेते सोमनाथ तडवळकर यांनी आवाज, संवाद, हावभाव, देहबोली, अंगविक्षेप, आदी अभिनयाच्या अंगाचा प्रात्याक्षिकांसह सराव करून घेतला. प्रकाश , ध्वनी, चित्रीकरण,संकलन, गायन, संगीत,सीन,शाॅट, टेक, आदी तांत्रिक बाजूंची सविस्तर माहिती सांगितली.
यावेळी उपसरपंच अभिनंदन मते, बालाजी मते, बालाजी भातलवंडे, प्रभाकर ढवळे, देवीदास भातलवंडे, अभिषेक भातलवंडे, सुमित शिंदे, वैभव भातलवंडे, सुधाकर मते, वसंत मते, अरविंद कुठे, समाधान मते, रंजित काकडे, फुलचंद काकडे,दिग्दर्शक योगराज पांचाळ,उपस्थित होते.
प्रास्ताविक बालाजी भातलवंडे तर आभार योगराज पांचाळ यांनी मानले.

Post a Comment

0 Comments