Subscribe Us

"जिल्हा मध्यवर्ती बँक नाबार्ड अंतर्गत आर्थिक साक्षरता अभियानास सुरुवात"


येरमाळा/तेरणेचा छावा:-
        केंद्र शासन व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आणि उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.उस्मानाबाद यांच्याद्व्यारे 'आर्थिक साक्षरता अभियान ' या मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे.या मोहिमेत येरमाळा व रत्नापुर या ठिकाणी  आयटी विभाग प्रमुख मास्टर ट्रेनर मयुर डबडे साहेब व मास्टर ट्रेनर  अभिजित जगताप साहेब शाखाधिकारी एस एम गव्हाने , तपासणीस एस एम दिवाने ,जी सी  शिंदे व  ज्युनिअर ऑफिसर संतोष जाधवर यांनी केंद्र शासनाकडून शेतकऱ्यासाठी अमलात आणलेल्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजना,पीक कर्ज त्वरित परत फेडीचे फायदे,प्रधानमंत्री फसल विमा योजना, आँनलाईन फसवणूक मोबाईल बँकिंग  अडचणी सापडल्याने शेतमालाची विक्री न करता वेअर हाऊस किंवा गोदामात ठेवणे तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये पीक नष्ट झाले तर विमा कंपनीस कळवा व त्याप्रमाणात बँकेकडून मदत मिळवा अश्या अनेक योजना बाबत माहिती व जनजागृती करण्यात आली.तस यांनी शेतकऱ्यांना मागर्दशन केले.तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या उस्मानाबाद पीक विमा भरण्यासाठी आवश्यक 7/12व 8अ  कागतपत्रे बँकेत मिळतील व पीकविमा देखील  बँकेतच भरावा असे आवाहन करण्यात आले.याप्रसंगी मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments