दहिफळ/ तेरेणेचा छावा:- शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर अँग्रो इंडस्ट्रीज लि. मोहा या गुळ पावडर कारखान्याचा २०२१-२२ या दुसऱ्या गळीत हंगामाच्या मिल रोलर पुजनाचा कार्यक्रम शुक्रवार ( दि..२ जुलै) रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ अशोक मोहेकर उपस्चित होते या प्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष हनुमंत मडके यांनी मार्गदर्शनपर विचार कर्मचाऱ्यां समोर मांडले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इम्रान शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यकारी संचालक संतोष मडके यांनी केले.
यावेळी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल मडके, सरपंच राजु झोरी,वि.का.सो.माजी चेअरमन अंनतराव मडके, संचालक बापुराव शेळके,अक्षय बलाई,शेषेराव मडके, धंनजय मडके,गजानन समुद्रे,शहाजी शेळके,शेतकी अधिकारी किशोर सावंत,नवनाथ करंजकर, लोमटे,मनोज घाडगे,सादिक मुंडे तसेच कर्मचारी अधिकारी, शेतकरी,मोहेकर मल्टिस्टेटचे सर्व पदाधिकारी, कारखान्याचे सभासद आदी उपस्थित होते.
0 Comments