उस्मानाबाद/तेरणेचा छावा:
-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उस्मानाबाद व कळंब तालुक्यात वृक्षारोपण,साडी वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप अशा विविध उपक्रमांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात परंतु साधेपणाने साजरा करण्यात आला.
उस्मानाबाद येथील दर्ग्यासमोर गरजू महिलांना साडीचे वाटप नगरसेवक बाबा मुजावर,फय्याज शेख, मुजीब पठाण,आसिफ शेख, अॕड.योगेश सोन्ने-पाटील,जयंत देशमुख,गजानन खर्चे,अशोक सुरवसे यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते साडी वाटप करण्यात आले. तसेच उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात नगरसेवक मृत्युंजय बनसोडे,सागर दुरुगकर,आनंद बनसोडे यांच्या हस्ते व उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. तसेच जुनोनी ता.उस्मानाबाद येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप फाद सय्यद,जैद शेख,अजिंक्य शिंदे सईद शेख यांच्या हस्ते करण्यात आले उस्मानाबाद येथील सांजा चौक येथील बालगृह व निरीक्षण गृह येथे अनाथ मुलांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना विविध फळांचे वाटप देखील करण्यात आले तर पोहनेर ता.उस्मानाबाद येथे अनाथ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. डोळा पिंपळगाव ता.कळंब येथे अशोक जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी वृक्षारोपण करत वाढदिवस साजरा केला या सोबतच कळंब येथील भैरवनाथ अध्यापक विद्यालय परिसरात वृक्षारोपण व डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुल उस्मानाबाद येथे वृक्षारोपण करत डॉ.प्रतापसिंह पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा धनेश्र्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष प्रतापसिंह पाटील हे दिवसभर त्यांच्या निवासस्थानी थांबून लोकांनी दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करत होते दिवसभरात जवळपास दोन हजार पेक्षा जास्त लोकांनी प्रत्यक्ष भेटून कोरोना नियमांचे पालन करत शुभेच्छा दिल्या.
0 Comments