Subscribe Us

युवा सेनेच्या राज्य विस्तारकपदी अविनाश खापे यांची निवड.


उस्मानाबाद/तेरणेचा छावा:- तालुक्यातील भाटशिरपुरा येथील युवक अविनाश खापे यांची युवा सेनेच्या राज्यविसतारक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती युवासेना प्रमुख व राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
अविनाश खापे हे गेली अनेक वर्षे मराठा आरक्षणावर लढा देत आहेत. ते मराठा विद्यार्थी आरक्षण कृती समितीचे प्रमुख होते तसेच शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. आमदार विनायक मेटे यांच्याशी आरक्षणावरून वैचारिक मतभेद झाल्याने त्यांनी शिवसंग्रामशी काडीमोड घेतली. काही महिन्यांपूर्वी त्यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे व युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता.
अविनाश खापे यांना कोणते पद दिले जाणार याची चर्चा होती अखेर त्यांची युवा सेनेच्या राज्यविसतारक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. खापे यांचे राज्यभर असलेले विद्यार्थ्यांशी संबंध याचा फायदा आगामी काळात युवासेनेला होणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई, खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, कळंब तालुका प्रमुख शिवाजी कापसे, शहरप्रमुख प्रदिप मेटे, उपतालुकाप्रमुख भारत सांगळे, युवासेनेचे तालुका प्रमुख मनोहर धोंगडे आदिनी अभिनंदन केले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments