Subscribe Us

चित्रपट आघाडी जिल्हाध्यक्ष योगराज पांचाळ यांची निवड


उस्मानाबाद/तेरणेचा छावा:-
कळंब तालुक्यातील दहिफळ येथील योगराज पांचाळ यांची चित्रपट आघाडी जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली आहे.उस्मानाबाद येथे अखिल भारतीय छावा संघटनेची बैठक दि.१२जुलै रोजी रायगड फंक्शन हाॅल येथे संपन्न झाली.या बैठकीत योगराज पांचाळ यांची नियुक्ती पत्र देऊन चित्रपट आघाडी जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
तेरणा काठची पोरं या मराठी वेबसीरीज मधुन शेकडो ग्रामीण कलाकारांना त्यांनी अभिनय करण्याची संधी दिली आहे.सामाजीक विषय घेऊन ते ग्रामीण कलाकारांना सोबत घेऊन आगामी काळात मराठी चित्रपट तयार करण्यात येणार आहे.पांचाळ हे ग्रामीण कलाकार म्हणुन परिचीत आहेत.चित्रकार,मुर्तीकार,लेखक,कवी साहित्यिक अश्या विविध कलेत योगराज पांचाळ पारंगत आहेत.त्यांच्या कला क्षेत्रातील धडपड बघून अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी निवड केली.या निवडीचे पत्र केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी मा. विजयकुमार घाडगे पाटील
(युवानेते प्रदेशध्यक्ष विद्यार्थी आघाडी)मा. पंजाबराव काळे पाटील(अ. भा. छावा, प्रदेशाध्यक्ष)
मा मनोजअण्णा मोरे(प्रदेश महासचिव)
मा. बालाजीदादा सूर्यवंशी पाटील
(प्रदेश कार्याध्यक्ष )मा गणेश जाधव, मा दिनेश रोचकरी, जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, मा कालिदास गायकवाड व असंख्य निष्ठावान कार्यकर्ते उपस्थित होते.
    या निवडीबद्दल ग्रामीण कलाकारा मित्र परिवाराकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments