Subscribe Us

मोहाच्या वैभवामध्ये भर मोहेकर स्टिल इंडस्ट्रीजचे उत्साही वातावरणात भुमीपुजन.


मोहा /तेरणेचा छावा:-
      येथे मोहेकर स्टिल इंडस्ट्रीजचे भुमीपुजन रविवारी  ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ अशोकराव मोहेकर यांच्या हस्ते करण्यात आले
                 याप्रसंगी मोहेकर मल्टीस्टेट व मोहेकर ॲग्रो इंडस्ट्रीज इंडस्ट्रीज चे संस्थापक अध्यक्ष चेअरमन हनुमंत (तात्या) मडके यांनी मोहेकर स्टिल इंडस्ट्रीज कारखान्यामध्ये सर्व प्रकारचे पत्रे, नट बोल्ट, खिळे ,बायडिंग वायर, चे उत्पादन होणार असून  ऑगस्टच्या  शेवटच्याआठवड्यापर्यंत काम पूर्ण करण्याचा मानस असल्याचे यावेळी सांगितले.
          यावेळी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर ,मोहाचे सरपंच राजु झोरी, माजी सरपंच बाबासाहेब मडके, मनोज जोशी ,विनय सहस्त्रबुद्धे आर्किटेक्चर पुणे,सिद्धिविनायक एग्रीटेक चे एमडी गणेश कामठे, मोहेकर मल्टीस्टेट चे कार्यकारी संचालक विशाल मडके,मोहेकर ॲग्रोचे कार्यकारी संचालक संतोष मडके,ग्रामसेवक सी एन लोकरे,मंडळ अधिकारी एन.डी.नागटीळक,सलिम मोमीन,पांडुरंग मडके,देवी नंदा फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे चेअरमन अतुल मडके,भारत जोशी तसेच मोहेकर मल्टीस्टेट चे मुख्य कार्यालय अधिकारी श्रीकांत मडके, अतुल मडके,  इम्रान शेख तसेच मोहेकर ॲग्रो  इंडस्ट्रीज चे कर्मचारी पदाधिकारी,गावातील गणमान्य व्यक्ति,ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments