Subscribe Us

कळंब येथील डॉ.श्याम चौधरी यांनी घेतला संकटाच्या काळात कोविड रुग्णांना सेवा देण्याचा निर्णय.


कळंब/तेरणेचा छावा:- कळंब येथील नामवंत बालरोग तज्ञ डॉ.श्याम चौधरी यांच्या चौधरी बाल रुग्णालयामार्फत 20 खाटांचे Dedicated Covid Health Center सुरू करण्यात आलेले आहे.
हॉस्पिटल सुविधांनी युक्त असून 10 ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत तसेच आवश्यकता भासल्यास तात्काळ ऑक्सिजन बेड वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत डॉ.चौधरी यांनी व्यक्त केले.
सोबतच  बालरुग्णालय सुद्धा चालू ठेवण्यात येणार असून नॉन-कोविड बालरुग्णांना वेगळ्या इमारतीत सेवा देण्यात येणार असल्याची माहिती डॉ चौधरी यांनी दिली.
     तत्पूर्वी रुग्णालयास आ.कैलास पाटील, उपविभागीय अधिकारी सौ.आहिल्या गाठाळ, वैद्यकीय अधीक्षक डॉ.जीवन वायदंडे, रुग्णकल्याण समिती सदस्य श्री.सुशील तिर्थकर, श्री.हर्षद अंबुरे यांनी रुग्णालयास भेट देऊन उपलब्ध सुविधा बद्दल समाधान व्यक्त केले.
     अशा या संकटाच्या काळात कोरोना रुग्णांसाठी  हॉस्पिटल सुरू केल्यामुळे कळंब  परिसरातील नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे. कारण सध्या उस्मानाबाद जिल्ह्यातील शासकीय व खाजगी  रुग्णालयातील सर्व बेड फुल असून रुग्णांना बेड अभावी मोठी गैरसोय निर्माण होत होती. त्यामुळे काही जणांना तरी याचा मोठा फायदा होणार आहे. अशाप्रकारे उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक खाजगी हॉस्पिटल्सनी कळंब येथील डॉ. श्याम चौधरी यांच्या प्रमाणे सेवा देण्यासाठी पुढाकार घेतल्यास अनेक रुग्णांना जीवदान मिळणार आहे. त्यामुळे खाजगी रुग्णालयांनी कोविंड रुग्णांसाठी हॉस्पिटल सुरू करण्याची  मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे. त्यामुळे अशा या जीवघेण्या संकटसमयी किती रुग्णालय पुढाकार घेतात हे  येत्या काही दिवसात पाहावयास मिळणार आहे.

Post a Comment

0 Comments