उस्मानाबाद तेरणेचा छावा :- सांजा येथील नाभिक व्यवसायिक मनोज झेंडे याने गरिबीला कंटाळून आत्महत्या केली होती. यांच्या कुटुंबास आमदार मा कैलास दादा घाडगे पाटील यांनी भेट घेऊन झेंडे परिवाराचे सांत्वन केले तसेच झेंडे परिवाराला आर्थिक मदत केली. त्याचप्रमाणे कै मनोज झेंडे यांच्या दोन्ही मुलांना शिक्षणासाठी सहकार्य करू अशी ग्वाही दिली. याप्रसंगी सांजा गावचे उपसरपंच सतीश बाप्पा सूर्यवंशी ,माजी सरपंच मुकुंद बापू सूर्यवंशी, हनुमंत जगदाळे महाराज, अखिल भारतीय जिवा सेनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव वाघमारे, जिल्हा प्रवक्ते रवींद्र राऊत, कर्मचारी जिल्हा संघटक विशाल जगदाळे, नाभिक कार्यकर्ते औदुंबर आगलावे ,नागेश साडेकर व सांजा गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments